
मेट्रो शहरात १ एप्रिलपासून इतक्या टक्क्यांनी वाढणार स्टँप ड्यूटी, महाविकास अघाड़ीचा निर्णय
मुंबई : महाविकासआघाडी सरकारने मुद्रांक शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचा हा निर्णय मुंबईसह ज्या शहरांमध्ये मेट्रोच्या कामकाजासंदर्भात बांधकामे सुरू आहेत त्यांच्यासाठी आहे. महाराष्ट्र सरकारने दस्तऐवज नोंदणी आणि तारण व्यवहारावर १ एप्रिलपासून मुद्रांक शुल्कावर एक टक्का अधिभार (Metro cess) लावण्याचे आदेश दिले आहेत.
राज्य सरकारच्या या निर्णयानंतर जनतेच्या खिशावर अतिरिक्त बोजा वाढणार आहे. त्यामुळे मुद्रांक शुल्कवाढीलाही विरोध होत आहे. जोपर्यंत मेट्रो पूर्ण क्षमतेने सुरू होत नाही, तोपर्यंत एक टक्का अधिभार लावू नये, अशी मागणी काही जणांनी केली आहे.
1 एप्रिलपासून 1% मुद्रांक शुल्क वाढणार
1 एप्रिलपासून, मुंबईसह अशा सर्व शहरांमध्ये 1% मुद्रांक शुल्क वाढणार आहे जिथे मेट्रो ट्रेन्स बांधल्या जात आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे मुद्रांक शुल्काची रक्कम वाचवण्यासाठी मालमत्ता खरेदीतही झपाट्याने वाढ झाली आहे.
ads
0 Response to " मेट्रो शहरात १ एप्रिलपासून इतक्या टक्क्यांनी वाढणार स्टँप ड्यूटी, महाविकास अघाड़ीचा निर्णय "
टिप्पणी पोस्ट करा