-->
औरंगाबाद : इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी चे वर्ग दि. 06/01/2022 ते दि. 31/01/2022 पर्यंत बंद- मनपा अयुक्तांचा मोठा निर्णय

औरंगाबाद : इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी चे वर्ग दि. 06/01/2022 ते दि. 31/01/2022 पर्यंत बंद- मनपा अयुक्तांचा मोठा निर्णय

औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळा/शैक्षणिक संस्था मधील इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी चे वर्ग शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्येवरिल संदर्भ क्र. 7 व 8 नुसार सुरु करण्यात आले आहे. राज्यातील कोव्हीड- 19 बाधीत रुग्णांची संख्या आणि Omicron new variant आजाराला पूर्णपणे नियंत्रणासाठी शाळेतील विद्यार्थ्यांचा होणारा जमाव कमी करणे आवश्यक आहे. त्यामूळे कोव्हिड-19 प्रतिबंधात्मक सर्वसाधारण उपाययोजना करुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये व त्याचा मानसिक परिणाम विद्यार्थी व पालकांवर होऊ नये या धारणेतून शाळा सूरू करण्यात आलेले इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी चे वर्ग दि. 06/01/2022 ते दि. 31/01/2022 पर्यंत बंद करण्यासाठी आदेशित करण्यात येत आहे.

इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी च्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पूर्वी प्रमाणे ऑनलाईन व दुरस्थ शिक्षण पध्दतीने सुरु ठेवण्यात यावे.

 1. औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील Containment Zone बाहेरील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळामध्ये विद्यार्थ्यांना सशरीर उपस्थित राहणे पासून दि. 06/01/2022 ते दि. 31/01/2022 पर्यंत सुट प्रदान करण्यात येत आहे. 

2. इयत्ता 9 वी ते इयत्ता 12 वी चे वर्ग पूर्वी प्रमाणे चालू ठेवण्यात याव्यात.

 3. सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळा त्यांचे धोरण प्रमाणे Online/ दुरस्थ शिक्षण पूर्वी प्रमाणे चालू ठेवतील. 

4. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाच्या पुर्व नियोजित सुरु असणार्या इयत्ता 10 वी व 12 वी च्या पुरवणी परिक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे सुरु ठेवण्यात येतील.

5. कोव्हिड आजाराचा प्रार्दुभाव लक्षात घेता वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल.

उपरोक्त आदेशाचे पालन न करणार्या कोणत्याही व्यक्ति/संस्था/समिती यांचे विरुध्द भारतीय दंड संहिताचे कलम 188 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल शिवाय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 याची कलम 51 ते 60 च्या तरतूदीनूसार देखील अशा व्यक्ति/संस्था/समिती यांचे विरुध्द कार्यवाही करण्यास पात्र असतील.

वरील आदेशाची अमंलबजावणी करीत असतांना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 73 अन्वये कोव्हिड-19 व Omicron new variant चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक ते कृत्य व सद्हेतूने केलेल्या कोणत्याही कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी कर्मचारी यांचे विरुध्द कुठल्याही प्रकारची कायदेशीर कार्यवाही अथवा खटला दाखल करता येणार नाही असे पत्रात नमूद आहे.

0 Response to "औरंगाबाद : इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी चे वर्ग दि. 06/01/2022 ते दि. 31/01/2022 पर्यंत बंद- मनपा अयुक्तांचा मोठा निर्णय "

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe