-->
औरंगाबादेत पुन्हा नियम कठोर, विना मास्क मिळणार नाही पेट्रोल

औरंगाबादेत पुन्हा नियम कठोर, विना मास्क मिळणार नाही पेट्रोल

औरंगाबाद: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने हाहाकार घातला आहे आणि या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनेक कडक निर्बंध लावलेले आहे. राज्य सरकारने असे म्हटले आहे की, सध्या लॉकडाउन नाही परंतु निर्बंध कडक होणार याची अंमलबजावणी औरंगाबाद प्रशासनाने केले आहे. औरंगाबाद येथे आता विना मास्क पेट्रोल मिळणार नाही. सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक आहे.

घरातील एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असेल तर त्याला होम qurantine राहण्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्तीचे कोरोना व्हॅक्सिनेशन झालेले बंधनकारक आहे. औरंगाबादेत नियमावली अधिक कडक करण्यात आलेली आहे म्हणून खबरदारी हाच एक उपाय आहे. ज्यांचे लसीकरणाचे एक डोस झालेले आहे त्यांनी दुसरे डोस ची तारीख आल्यानंतर आहे आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केलेला आहे.

रुग्ण संख्या वाढली तर नियम आधी कडक करावे लागेल असे संकेत औरंगाबाद प्रशासनाने दिलेले आहे. घाबरण्याची गरज नाही. परंतु खबरदारी घेणे गरजेचे आहे म्हणून नागरिकांनी याबाबत सहकार्य केल्यास कोरोनाशी लढा देणे हे शक्य होईल. म्हणून सर्व कडक निर्बंधांना नागरिकांचे प्रतिसाद मिळणे अत्यंत आवश्यक आहे.

0 Response to "औरंगाबादेत पुन्हा नियम कठोर, विना मास्क मिळणार नाही पेट्रोल"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe