-->
पाणी पुरवठा लाईन त्वरित पूर्ण करा : आमदार संजय शिरसाट

पाणी पुरवठा लाईन त्वरित पूर्ण करा : आमदार संजय शिरसाट

औरंगाबाद : आमदार संजय शिरसाट यांनी आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते भूमिपूजन झालेल्या विजयनगर, सिंधी कॉलनी, संत एकनाथ रंगमंदिर उस्मानपुरा, पडेगाव-मिटमिटा येथील कामे सुरू करण्याआधी या भागात ड्रेनेज लाईन व पाणी पुरवठा लाईन टाकण्यासंदर्भात पाणी पुरवठा एकबोटे व तायडे या अधिकाऱ्यांसोबत पाणी पुरवठा लाईन संदर्भात पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा करुण तातडीने काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. जेणे करून हे काम पूर्ण झाल्यास रस्त्याची कामे पूर्ण करता येईल असे सूचना केल्या.

यावेळी आमदार संजय शिरसाट म्हणाले की, तुम्ही पाणी पुरवठा लाईन लवकर पूर्ण करावी, जेव्हा केलेल्या रस्त्याचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात होत असते आणि तेव्हा वेळेच्या आत रस्ते पूर्ण होतात, जेव्हा पाण्याची लाईन टाकण्यात येईल तेव्हा पुन्हा रस्ते खोदून करावे लागेल त्यामुळे मी केलेल्या रस्त्या पूर्ण खराब होईल हा त्रास पुन्हा नागरिकांना सहन करावा लागणार आहे, त्यामुळे विजयनगर, सिंधी कॉलनी, भीमपुरा उस्मानपुरा, मीटमिटा येथील पाणी पुरवठा लाईन टाकण्याचे काम त्वरित पूर्ण करा, जेणे करून ही लाईन पूर्ण होऊन नागरिकासाठी रस्ते तयार करता येईल.फक्त भूमिपूजन करून जबाबदारी संपत्त नाही, तर सुरु झालेले काम उत्तम पद्धतीने चालू आहे का, त्यात कुठ अडचणी येतात का, त्याच बरोबर ज्या ठिकाणी रस्ता होतोय त्या ठिकाणी भूमिगत गटार आहे का, पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन टाकलीय का या सर्व गोष्टी बघून सुंदर होणारे रस्ते आणि मजबूत करणे हे माझ ध्येय असते असे पाणी पुरवठा अधिकारी यांना सूचना करत लवकर काम पूर्ण करण्याचा सूचना केल्या.


याप्रसंगी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, उपशहरप्रमुख राजू राजपूत, अंबादास म्हस्के, नगरसेवक राजू तनवाणी, सुभाष शेजवळ, नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, माजी नगरसेवक हिरालाल वाणी, शाखाप्रमुख नितीन पवार, पंकज वाडकर, प्रकाश दूबिले, राहूल यलदी, बापू आढाव युवासेनाशहर समन्वयक नंदकूमार म्हस्के, गणेश रवीवाले, उपशाखाप्रमुख कीसन भैय्या कणिसे, युवासेना सूहास भैय्या ठोंबरे, पवन रवतले, जगदीश लव्हाळे, अनिल चोंडिये, मयूर तुपे, सोनू बहादूरे, संतोष खरात आदींची उपस्थिती होती.

0 Response to "पाणी पुरवठा लाईन त्वरित पूर्ण करा : आमदार संजय शिरसाट"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe