
मोठी बातमी : ११वीच्या प्रवेशासाठी लागणारी CET परीक्षा हायकोर्टाने केली रद्द- राज्य सरकारला हायकोर्टाचा दणका
राज्य सरकारला हयकोकोर्टकडून दणका
मुंबई : कोरोना काळात अनेक परिक्षा रद्द झाल्या तसेच या अगोदर दहावीची परिक्षा कोरोनाच्या प्रादुर्भावाने रद्द झाली होती. दहावीची परिक्षा रद्द झाल्यानंतर राज्य सरकार द्वारे ११वीच्या प्रवेशासाठी सीईटी परिक्षा घेण्याचे ठरवले होते. मात्र या निर्णयाला मुंबई मा.हायकोर्टात आव्हान देण्यात आले. अनन्या पतकी याने या विषयावर याचिका दाखल केली होती.
त्यावर आज महत्वाचा निकाल देतांना मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला चांगलाच दणका दिला आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्याच्या राज्य सरकारच्य निर्णयाला हायकार्टाने रद्द केले आहे. तसेच दहावीच्या मुल्यांकनाच्या आधारे इयत्ता ११वी वर्गात प्रवेश देण्याचे आदेश दिले आहे. अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच करावेत, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.राज्य सरकारनं अकरावी प्रवेशाबाबत 28 मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकाला स्थगिती देण्याची मागणी करत अनन्या पत्की या आयसीएससीच्या विद्यार्थिनीनं ही याचिका दाखल केली होती.
0 Response to " मोठी बातमी : ११वीच्या प्रवेशासाठी लागणारी CET परीक्षा हायकोर्टाने केली रद्द- राज्य सरकारला हायकोर्टाचा दणका"
टिप्पणी पोस्ट करा