
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे धावले व्यापार्यांच्या मदतीला, न्यु गुलमंडी (औषधी भवन) नाल्याचे काम जलदगतीने करण्याचे आदेश
मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१
Comment
शिवसेना नेता चंद्रकांत खैरे यांना व्यापारी बांधवांनी दिले निवेदन
औरंगाबाद : लॉकडाऊन, त्यानंतर सिमेंट रस्ता आणि दलालवाडी पुलाचे काम यामुळे दीड वर्षांपासून रस्ता बंद असल्याने व्यापारी त्रस्त झाले आहे. यामुळे व्यापारी बांधवांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची भेट घेऊन निवेदन दिले, आणि न्याय देण्याची मागणी केली. तात्काळ दखल घेत घटनास्थळी भेट देऊन न्यु गुलमंडी (औषधी भवन) नाल्याचे काम जलदगतीने करा. नागरिकांना व व्यापाऱ्यांना न्याय देण्याची सूचना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची प्रशासनाला दिली.
शहरातील मुख्य बाजारपेठ व रहदारीचा भाग म्हणून नागरिकांची नेहमी वर्दळ असते. रस्ता बंद असल्याने अनेक अपघात वाढले असून ट्राफिक जॅम होत असल्याने वादविवाद होत आहे. यामुळे प्रशासनाने यांची गंभीर दखल घ्यावी, असे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी संबंधित ठेकेदार व मनपा आणि एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना दिली.
यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, अजय शाह, शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता फड, उपभियंता गाडेकर, एमएसआरडीसीचे अभंग, माजी नगरसेवक प्रफुल मालानी, सचिन खैरे उपस्थित होते.
0 Response to "शिवसेना नेते चंद्रकांत खैरे धावले व्यापार्यांच्या मदतीला, न्यु गुलमंडी (औषधी भवन) नाल्याचे काम जलदगतीने करण्याचे आदेश "
टिप्पणी पोस्ट करा