-->
औरंगाबाद : राष्ट्रीय लोकअदालतीचे 1 ऑगस्ट रोजी आयोजन

औरंगाबाद : राष्ट्रीय लोकअदालतीचे 1 ऑगस्ट रोजी आयोजन

औरंगाबाद : राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी  निर्देशित केल्याप्रमाणे उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद आणि जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय, औरंगाबाद येथे रविवार दिनांक 01 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10.30 वाजल्यापासून तसेच सर्व तालुका स्तरांवरील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.सदरील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार अपघात, धनादेश अनादरीत प्रकरणे, वैवाहिक वाद, भूसंपादन, प्रलंबित तडजोडयुक्त दिवाणी व फौजदारी प्रकरणे, रोख रक्कम वसुलीचे दावे, विद्युत प्रकरणे, लवाद प्रकरणे‍ तसेच विविध दुरध्वनी व भ्रमणध्वणी कंपन्याची वादपूर्व प्रकरणे, विविध राष्ट्रीयकृत व खाजगी बँका आणि वित्तीय संस्थाची कर्ज इतर वादपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आलेली आहेत. जे पक्षकार प्रत्यक्ष सहभाग नोंदवू शकणार नाहीत अशा पक्षकारांसाठी महाराष्ट्रात प्रथमच ई-लोकअदालतीचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे.

जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश औरंगाबाद श्रीपाद टेकाळे, यांनी सर्व नागरिकांनी, संबंधित पक्षकारांनी, सन्माननीय वकिलांनी व समाजसेवकांनी, वित्तीय संस्थांनी व इतर संबंधितानी रविवार दिनांक 01 ऑगस्ट 2021 रोजी आयोजित होणाऱ्या लोकअदालतीचे/ ई-लोकअदालतीमध्ये उर्स्फुतपणे सहभागी होऊन दाखलपूर्व व न्यायालयात प्रलंबित जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडी निकाली काढण्यासाठी व समेट घडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.

तसेच ज्येष्ठ नागरीक किंवा ज्या लोकांना कोवीड-19 संसर्गापासुन बचावासाठी / अपरिहार्य कारणास्तव लोकअदालतमध्ये प्रत्यक्ष हजर राहता येणार नाही, त्या लोकांना ई-लोकअदालतीमध्ये सहभाग घेता येईल. त्यामुळे अशा लोकांना आपल्या घरुनच लोकअदालतीच्या कामकाजामध्ये अटी व शर्तीचे पालन करुन सहभाग नोदंविता येईल. ज्या पक्षकारांना ई-लोकअदालतीमध्ये सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी दिनांक 20 जुलै 2021 रोजी पर्यंत संबंधित न्यालयात किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण औरंगाबाद येथे संपर्क करुन आपल्या नावाची नोंद करावी असे आवाहन श्रीमती वै.प्र.फडणीस, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे करण्यात आले आहे

0 Response to "औरंगाबाद : राष्ट्रीय लोकअदालतीचे 1 ऑगस्ट रोजी आयोजन"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe