
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे शिष्टमंडळ प्रशासकाच्या भेटीला
सिडकोचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सिडको प्रशासकाकडे केली. यावेळी मालमत्ता हस्तांतरण, बांधकाम परवानगी आणि भोगवटा कार्यवाही, लीज होल्डचे फ्री होल्ड करण्याबाबत अशा विविध मागण्या शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे शिष्टमंडळ प्रशासकाकडे निवेदनाद्वारे मांडण्यात आल्या. यावेळी सिडको हडको संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा शिवसेना शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, भाकासे मराठवाडा चिटणीस प्रभाकर मते पाटील, उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, बाबासाहेब डांगे, माजी नगरसेवक मकरंद कुलकर्णी, अनिल जैस्वाल, किशोर नागरे, वीरभद्र गादगे, साहेबराव घोडके, शिवा लुगांरे आदींसह नागरीक उपस्थित होते.
एन - ४ सिडको हनुमान मंदिर परिसराततील भूखंड रद्द करा
सिडको एन ४ च्या मध्यवर्ती भागात जुने हनुमान मंदिर आहे. या भागात सिडकोने पोलीस स्टेशनसाठी भूखंड असल्याचे कळते. त्यामुळे स्थानिक नागरिकांचा या गोष्टीला तीव्र विरोध असून शांतता भंग होईल. या ठिकाणी पुरातन बारव असून गणपती विसर्जन होत असते. या सर्व गंभीर बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून नागरिकांना न्याय देण्याची मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली. यावेळी मंदिर समितीचे आसाराम तळेकर, सोमनाथ साखरे, पंढरीनाथ डिघुले, हरिभाऊ पवार, दामुअन्ना नवपुते, ऍड. केशवराव चौधरी, बजरंग विधाते,काशीनाथ थोरात, भागवत शिंदे, प्रशांत डिघुले, मुकुंद जोशी, मनोज बोरा आदींसह भाविक उपस्थित होते.
0 Response to "शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे शिष्टमंडळ प्रशासकाच्या भेटीला"
टिप्पणी पोस्ट करा