-->
जिन्सी पोलीसांनी आणखीन 08 तलवारी, व 01 गुप्ती असे एकुण 09 धारदार शस्त्र जप्त केले आहे.

जिन्सी पोलीसांनी आणखीन 08 तलवारी, व 01 गुप्ती असे एकुण 09 धारदार शस्त्र जप्त केले आहे.


ऑनलाईन मागविलेले तलवार खरेदी करणा-या टोळीचा पर्दाफाश 

औरंगाबाद : दिनांक 04/07/2021 रोजी आरोपी नामे इरफान खान ऊर्फ दानिश खान पिता अय्युब खान, वय 20 वर्ष रा. हमजा मस्जीद जवळ,जुना बायजीपुरा, औरंगाबाद यास ताव्यात घेवून पोलीस स्टेशन जिन्सी येथे आणुन तंत्रशुध्द पध्दतीने विचारपुस करुन माहीती घेतली असता नमुद आरोपी त्याचे जवळ असलेल्या आणखी 36 तलवारी 06 कुकरी, 02 गुप्ती असे एकुण 49 धारदार शस्त्र जप्त करण्यात आलेले आहे नमुद आरोपीस अधिक विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने याचे ओळखीचे मित्र नामे 1)राशेद सालमीन दिप वय 22 वर्ष रा. धंदा शिक्षण रा.इंदीरानगर,बायजीपुरा,ग.न.14,औरंगाबाद 2)शेख अरबाज शेख शेरु वय 21 वर्ष धंदा मिस्तरी रा इंदीरानगर, बायजीपुरा,ग.न.20,औरंगाबाद3) फैजान हारुन कुरैशी वय 20 वर्ष थंदा मटन विक्री रा. पुष्पक गार्डन चिकलठाणा, औरंगाबाद.4)मोहंमद फरदीन मोईन बागवान वय 19 वर्ष रा.इंदीरानगर, वायजीपुरा, ग.न.26, औरंगाबाद.यांना तलवारी विक्री केल्याचे कबुली दिली असता नमुद आरोपीताचा शोध घेऊन ताब्यात घेऊन त्यांना सदर गुन्ह्या बाबत विचारपुस करुन त्यांचे ताव्यातुन 04 तलवारी व 01 गुप्ती-जप्त करुन नमुद आरोपीतांना सदर गुन्ह्यात दि. 05/07/2021 रोजी अटक केली आहे.तसेच मुख्य आरोपी ईरफान खान याने सय्यद मुजाहेद उर्फ मुज्जु पिता सय्यद हवीव रा. किराडपुरा, औरंगाबाद.यास दोन तलवारी विक्री केल्याचे कबुल केल्याने त्याचा दिल्या पत्यावर जाऊन शोथ घेतला असता तो घरी मिळुन आला नाही. त्याचे राहते घराची दोन पंचा समक्ष . घरझडती घेतली असता 02 तलवारी मिळुून आल्याने ते जप्त करण्यात आले आहे. तसेच आरोपी नामे अबुजर खान जफर खान रा.जाली दर्गा जवळ औरंगाबाद यांचा दिल्या पत्यावर जाऊन शोध घेतला असता तो घरी मिळून आला नाही. त्याचे राहते घराची दोन पंचा समक्ष घरझडती घेतली असता 02 तलवारी मिळून आल्याने ते जप्ती पंचनामा करुन जप्त करण्यात आले आहे.


एकुण 8 तलवारी व 01 गुप्ती जप्त करण्यात आलेली आहे. वरील नमुद चारही आरोपीतांना आज रोजी मा.न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने नमुद आरोपीतांची दि.08/07/2021 पावेतो PCR मिळालेली आहे. सदरची कामगीरी मा.डॉ. निखील गुप्ता साहेब, पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर, मा.पोलीस उप आयुक्त डॉ.दिपक गि्हे साहेब, सहायक पोलीस आयुक्त मा. निशीकांत भुजबळ, रविंद्र साळोखे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश आघाव,व्ही. एम.केंद्रे,स.पो.निरीक्षक अजबसिंग जारवाल गुन्हे शाखा, व जिन्सी गुन्हेशोध पथकाचे पोलीस उप निरीक्षक शेख सरवर, ठाकुर,सफौ.अय्युब पठाण,संपत राठोड,चालक एजाज खान, शेख हारुन,भाऊसाहेब जगताप,गणी शेख, संजय गावंडे,बाळु थोरात,पोलीस शिपाई सुनील जाधव हकीम शेख,संतोष बमनात,घनश्याम सानप यांनी केली आहे.


0 Response to "जिन्सी पोलीसांनी आणखीन 08 तलवारी, व 01 गुप्ती असे एकुण 09 धारदार शस्त्र जप्त केले आहे."

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe