-->
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची  प्रभावी अंमलबजावणी करा - पुलिस उपायुक्त मीना मकवाना

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा - पुलिस उपायुक्त मीना मकवाना

औरंगाबाद: राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायद्यातील तरतुदींची कठोरपणे अंमलबजावणी करून तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना पोलिस उपायुक्त मीना मकवाना यांनी दिल्या. त्याचबरोबर प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलिस, आरोग्य आणि अन्न औषध प्रशासनाने संयुक्त कारवाईवर भर द्यावा, असेही निर्देश दिले.

पोलिस आयुक्तालयात जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक मकवाना यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिनिधी डॉ. पी.एम.कुलकर्णी, मनपाच्या डॉ.अर्चना राणे, सहायक पोलिस निरीक्षक व्ही.ए.यमपुरे, रावसाहेब जोंधळे, कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. अमोल काकड, अशासाकीय सदस्य डॉ.कार्तिक रामन, समाजसेवक प्रदीप माळी, मधुकर (अण्णा) वैद्य, आदींची उपस्थिती होती.

बैठकीत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी. पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत येणाऱ्या प्रत्येक पोलिस स्थानकास चालान पुस्तिका वितरित करण्यात आल्या आहेत. त्यासंदर्भातील अहवालही सादर करण्याबाबत मकवाना यांनी सूचना दिल्या. बैठकीचे प्रास्ताविक डॉ. काकड यांनी केले.

या क्रमांकावर होईल समुपदेशन

ज्यांना तंबाखूची सवय सोडावयाची असेल अशांसाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्षाच्या क्विट लाईन टोल फ्री क्रमांक (1800112356), औरंगाबाद येथील समाजसेवक तथा उमंग संस्थेचे डॉ. रामन (मो.क्र. 9923088034), व्यसन मुक्त अभियानाचे श्री. माळी (मो.क्र. 9370704018) यांच्याशी नमूद क्रमांकांवर संपर्क साधून तंबाखूपासून नागरिक व्यसनमुक्तीबाबत समुपदशेन घेऊ शकतात, असेही श्रीमती मकवाना म्हणाल्या

0 Response to "राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा - पुलिस उपायुक्त मीना मकवाना"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe