
औरंगाबाद पोलिसांचे कार्य, अल्पवयीन मुलगा व मुलगीचा शोध घेउन पालकांच्या सुपुर्द केले
बुधवार, ३० जून, २०२१
1 Comment
औरंगाबाद : कोरोना काळात पोलिसांचे कार्य सर्वांच्या समोर आहे. या काळात औरंगाबाद पोलिसांनी आपली भुमीका चांगल्या प्रकारे निभावली आहे. अनेक ठिकाणी बंदोबस्त असो, विंâवा नियमांचे पालन करण्याकरीता उन्हात किंवा पावसात उभे राहने असो, असे अनेक काम ते पुर्णपणे पार पाडत आहे.
पोलिस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता यांनी शहरातील हरवलेली अथवा अपहरण झालेल्या अल्पवयीन मुले, मुलींचा शोध घेण्याकरिता पोलिस ठाणेस्तरावर मुस्कान पथके कार्यान्वित केलेली आहेत. नुकतेच सातारा रोड पोलीस ठाण्याच्या मुस्कान पथकाने एक अल्पवयीन मुलगा व एक अल्पवयीन मुलगी यांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या सुपूर्द केले आहे.
Very good
उत्तर द्याहटवा