-->
फुलंब्री विधानसभा मतदार संघाचे मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांना आवाहन

फुलंब्री विधानसभा मतदार संघाचे मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांना आवाहन

औरंगाबाद, दिनांक 30 (जिमाका) : ज्या मतदारांचे 106 फुलंब्री विधानसभा मतदार संघाचे मतदार यादीमध्ये छायाचित्र नाही अशा सर्व मतदारांनी त्या-त्या तालुक्यातील तहसिल कार्यालयातील मतदार  संघाचे कार्यालयात कागदपत्रे सादर करुन आपले मतदार यादीतील छायाचित्र दुरस्ती करण्यासाठी नमुना 8 चा अर्ज भरुन द्यावा किंवा ज्या मतदाराचे नाव छायाचित्रासह मतदार यादीत यापुर्वीच दुबार आलेले असतील तर अशा मतदारंनी छायाचित्र नसलेल्या नावाची वगळणी करण्यासाठी नमुना 7 चा अर्ज भरुन तातडीने आपले दुबार नाव वगळून घ्यावे असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, औरंगाबाद तथा मतदार नोंदणी अधिकारी, 106 फुलंब्री विधानसभा मतदार संघ  यांनी केले आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे निर्देशानुसार  लोकसंख्या शास्त्रीयदृष्टया समान नोंदी, मतदार ओळखपत्रातील त्रुटी दुर करणे, दुबार व समान नोंदणी व छायाचित्र नसलेल्या मतदारांची दुरस्ती किंवा नियमानुसार वगळणी करणे इत्यादी सर्व कामे भारत निवडणूक आयोग यांचे निर्देशानुसार करण्यात येतात.

त्याप्रमाणे 106 फुलंब्री विधानसभा मतदार संघ, तालुका फुलंब्री व तालुका औरंगाबाद मधील छायाचित्र नसलेले 1484 एकूण मतदार शिल्लक असून त्याबाबत तातडीने कार्यवाही पुर्ण करणेबाबत मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी निर्देश दिलेले आहे. त्या अनुषंगाने आतपर्यंत मतदान केंद्रस्तरी अधिकारी (बीएलओ) यांचे मार्फत छायाचित्र नसलेल्या मतदारांच्या शोध घेऊन तसेच अशा मतदारांचे नावाची यादी मतदान केंद्रावरही प्रसिध्द करण्यात येऊन ज्या मतदारांचा संपर्क झालेला आहे किंवा पत्यावर आढळून आलेले आहे अशा मतदारांकडून त्यांचे छायाचित्र व कागदपत्रे हस्तगत करुन घेण्यात येऊन छायाचित्राची मतदार यादीत दुरस्ती करण्यात आलेली आहे. परंतु काही मतदार यांची मतदान केंद्रस्तराय अधिकारी (बीएलओ) यांचे मार्फत स्थानिक चौकशी करुनही पत्ते सापडत नाही किंवा काही मतदार इतरत्र स्थलांतरीत झालेले असल्याने त्याचेही पत्ते किंवा संपर्क क्रमांक मिळून येत नसल्याने त्यांच्या नावाच्या मतदार यादीतील छायाचित्र दुरस्ती करण्यास अडचणी निर्माण होत आहे.

सदर नाव दुरस्तीसाठी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) किंवा संबंधित तहसिल कार्यालय यापैंकी एकाकडे दि. 07 जुलै, 2021  अधिकारी, 106 फुलंब्री विधानसभा मतदार संघ यांनी केलेले आहे. तसेच मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे एनआयसी औरंगाबाद यांचे बेबसाईट पोर्टलवरही प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर यादीतुन आपले नावाची खात्री करुन घेऊन त्याप्रमाणे आपल्या नावाची आवश्यक ती दुरस्ती करुन घेणबाबत याव्दारे आवाहन करण्यात येत आहे.

0 Response to "फुलंब्री विधानसभा मतदार संघाचे मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांना आवाहन"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe