-->
पांढरी खानापूर गावातील लोकशाही मार्गाने आंदोलन करणार्या बौद्ध बांधवांवर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या संबंधित विभागीय आयुक्त व पोलीस अधिकार्याची एसआईटी मार्फत चौकशी करून तात्काळ निलंबित करण्याची मागणी

पांढरी खानापूर गावातील लोकशाही मार्गाने आंदोलन करणार्या बौद्ध बांधवांवर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या संबंधित विभागीय आयुक्त व पोलीस अधिकार्याची एसआईटी मार्फत चौकशी करून तात्काळ निलंबित करण्याची मागणी

नितीन दाभाडे:- वरील विषयास अनुसरून आपणास सर्व पक्षीय आंबेडकरवादी पक्ष संघटना व आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीने जाहीर निवेदन देत आहोत की, आपल्या फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेवर चालणा-या व पुरोगामी राज्य म्हणून समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यामधील पांढरी खानापूर गावामध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान बांधण्याची प्रशासकीय परवानगी असूनही याच गावातील काही जातीवादी मानसिकतेच्या गावगुंडांनी या महामानवाच्या नावे असणाऱ्या स्वागत कमानीला विरोध करून हे काम बंद पाडले होते व तेथील गावात राहणाऱ्या बौद्ध समाजाच्या ग्रामस्थांवर सामाजिक बहिष्कार टाकला आहे. याचा निषेध म्हणून गावातील हजारो बौद्ध बांधवांनी घडलेली घटना शासनाच्या निदर्शनास यावी व न्याय मिळावा यासाठी लोकशाही मार्गाने सदरील गाव सोडून गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी, पुरूष, विद्यार्थी-विद्यार्थीनी, लहान मुले यांनी रख-रखत्या उन्हात शेकडो किलोमीटर सुमारे ६ दिवस पायी चालत अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालय गाठले होते व त्याठिकाणी पोहोचूनही तेथील प्रशासनाने सदरील आंदोलनाची कोणतीच दखल घेतली नव्हती. तरीही सदरील बौद्ध आंदोलक लोकशाही मार्गाने अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बसून आंदोलन करीत होते. परंतु काल दि. ११/०३/२०२४ रोजी तेथील पोलीस प्रशासनाने सुरू असलेल्या शांतताप्रिय आंदोलनावर

बेछूट अमानुष लाठी चार्ज सुरू केला. यामध्ये अनेक लहान मुले, वयोवृद्ध समाजबांधव यांच्यावरही अमानुषपणे लाठी चार्ज करण्यात आला. यामुळे अनेक माता-भगिनी, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, पुरूष मंडळी मोठ्या प्रमाणावर जखमी झाले आहेत. सदरील आंदोलनात लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना जखमी करून त्यांच्यावरच स्थानिक प्रशासनाकडून खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. या घटनेमुळे देशभरातील बौद्ध बहुजन समाज बांधवांमध्ये सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष पसरत असून भारतीय राज्यघटनेवर चालणारा लोकशाही देश असूनही येथे लोकशाही मार्गाने बौद्ध बांधवांनी केलेले आंदोलन चिरडण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न होत आहे.

तरी प्रशासनाकडून बौद्ध बांधवांवर करण्यात आलेल्या अमानुष, अत्याचाराचा आंबेडकरी चळवळीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे व शासनाने याबाबत लाठी चार्ज करणारे अधिकारी व त्यांना आदेश देणारे तेथील विभागीय आयुक्त यांची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. नसता लोकशाही मार्गाने महाराष्ट्रभर शासन विरोधात रस्त्यावर येऊन आंदोलन छेडण्यात येईल,असा ईशारा आज सर्व पक्षीय आंबेडकरवादी पक्ष संघटना व आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीने देण्यात आला, यावेळी आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचे अध्यक्ष दिपक निकाळजे, आनंद कस्तुरे, सचिन जोगदंड, मुकेश खोतकर,विजय शिनगारे,अनामी मोरे, आदित्य वाहुळ,कपिल बनकर, संतोष चव्हाण,शुभम नवगिरे,गौरव मगरे, अमोल पाखरे,सोनु नरवडे, नागेश जावळे, संदीप रगडे, विशाल इंगळे, नितीन आदमाने, समाधान जोगदंड, साहेबराव दाभाडे,सागर अंभोरे,निलेश वर्दे,शेख शब्बीर,शेख फजलुद्दीन,खलील मिर्झा, नितीन निकाळजे, सिध्दार्थ सुर्यवंशी,दिपक गवळी, व मोठ्या संख्येने आंबेडकरी चळवळीतील भिमसैनिक उपस्थित होते..

0 Response to "पांढरी खानापूर गावातील लोकशाही मार्गाने आंदोलन करणार्या बौद्ध बांधवांवर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या संबंधित विभागीय आयुक्त व पोलीस अधिकार्याची एसआईटी मार्फत चौकशी करून तात्काळ निलंबित करण्याची मागणी "

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe