-->
फुलंब्रीत रमजानमुळे फळांचा बाजार तेजीत

फुलंब्रीत रमजानमुळे फळांचा बाजार तेजीत


 (लोकसवाल न्यूज प्रतिनीधी शाहरुख शेख फुलंब्री)

फुलंब्री: दि २०/०३/२०२४
मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना सुरू आहे. उपवासाचा महिना असल्याने रसदार फळांना मागणी वाढली असून त्या तुलनेत ठोक बाजारात मात्र, आवक सर्वसाधारणच आहे. परिणामी, टरबूज, अननस, द्राक्ष, आंबे, चिकू, खरबूज, डाळिंब या फळांच्या दरात १० ते १५ टक्के
वाढ झालेली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने टरबुजांच्या मागणीत वाढ झाली आहे. टरबुजांच्या दरात किलोमागे पाच ते दहा रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार एक किलो टरबुजाची विक्री २० ते ३० रुपये
दराने विक्री केली जात आहे. सर्वाधिक मागणी शुगर क्वीन, मॅक्स, मेलडी या जातीच्या टरबुजांना आहे. ही टरबूज रसाळ आहेत तसेच चवीलाही गोड आहेत. उन्हाच्या तडाख्यामुळे ज्यूस सेंटर चालक, उपाहारगृह चालक तसेच फळ विक्रेत्यांकडून टरबुजांच्या मागणीत वाढ झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. बाहेरील जिल्ह्यासह महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून टरबूज विक्रीस येत आहेत. गेल्या काही दिवसांत टरबुजाची आवक आणखी वाढेल,असे व्यापान्यांनी सांगितले. साधारणपणे ४० ते ५० टनांपर्यंत टरबुजाची आवक मार्च ते एप्रिल महिन्यात होते. मुस्लीम धर्मीय रमजान महिन्यात उपवास करतात या उपवासामुळे टरबूजांच्या मागणीत मोठी वाढ होते रमजान महिना सुरु असल्याने सर्वच फळांचे भाव वाढलेले आहेत. फळांची आवक सर्वसाधारणपणे सुरु असून मागणी वाढलेली आहे. त्यामुळे भाववाढ झालेली आहे. अननस, द्राक्ष टरबूज, खरबूज आणि डाळिंबाला मागणी वाढलेली आहे. याशिवाय इतरही फळांच्या मागणीत वाढ झालेली आहे. 
फुलंब्री टी पॉइंट परिसरात मुस्लिम बांधव फ्रूट खरिदीसाठी गर्दी करताना दिसून आले 

0 Response to "फुलंब्रीत रमजानमुळे फळांचा बाजार तेजीत"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe