-->
महाराष्ट्र राज्यात नवीन नियमावली जाहिर, काय सुरु? काय बंद? वाचा सविस्तर माहिती

महाराष्ट्र राज्यात नवीन नियमावली जाहिर, काय सुरु? काय बंद? वाचा सविस्तर माहिती

महाराष्ट्र: राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार राज्य सरकारने निर्बंध आणखी कडक केले आहेत. तसेच या नियमावलीची अंमलबजावणी ही उद्या मध्यरात्रीपासून (10 जानेवारी) करण्यात येणार आहे. असे सांगण्यात आले आहे.

राज्यात रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी असणार आहे. तसंच सुधारित नियमावलीत शाळा, महाविद्यालय, हॉटेल, मॉल्स, शॉपिंग मॉल, मैदानं, क्रीडांगणांसाठी ही निर्बंध लावण्यात आले आहे.


वाचा काय बंद असणार?

राज्यात मैदानं, पिकनिक स्पॉट, स्विमिंग पूल, स्पा, जिम पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच  शाळा आणि महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपर्यंत बंद असतील.  


काय सुरु असणार आहे ? 

हॉटेल 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार

हॉटेलवर काही निर्बंध घालण्यात आली आहेत. सुधारित नियमावलीनुसार एकूण क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेनेच हॉटेल सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली. तसेच रात्री 10 वाजेपर्यंत हॉटेल सुरु ठेवता येणार आहेत. 

हॉटेल रेस्टॉरंटमध्येही दोन्ही डोस पूर्ण झालेल्या लसवंतांनाच परवानगी असणार आहे. तसेच होम डिलीव्हरी पूर्ववेळ सुरु राहिल. राज्यात प्रवेश करण्यासाठी दोन्ही डोस झालेलं असणं बंधनकारक असणार आहे. तसेच आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह असायला हवा. असे महाराष्ट्र सरकारची नवीन नियमावली जाहिर करण्यात आली आहे.


0 Response to "महाराष्ट्र राज्यात नवीन नियमावली जाहिर, काय सुरु? काय बंद? वाचा सविस्तर माहिती"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe