-->
 हतवन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी हालचालींना वेग, दीड हजार हेक्टर क्षेत्र येईल ओलीताखाली

हतवन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी हालचालींना वेग, दीड हजार हेक्टर क्षेत्र येईल ओलीताखाली

जालना : जालना येथील हतवन प्रकल्पाला मार्गी लावण्यासाठी हालचालींना वेग मिळाला आहे. या प्रकल्पात भाटेपुरी, बापकळ, वडीवाडी शिवाराचा कायापलट होणार आहे. सन २००८ मध्ये हा प्रकल्प ५४ कोटी रुपयांमध्ये झाला असता परंतु त्यांची आज किम्मत ५४ कोटीहुन ३१० कोटी इतकी पोहचली आहे. हातवन येथील प्रकल्पासाठी मंत्री राजेश टोपे यांनी पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पासाठी केवळ वक्फ जमीनीचा मुद्दा शिल्लक असुन त्यासाठी राज्याच्या विधी व न्याय विभागाकडुन अहवाल मागविण्यात येत आहे. मंत्री राजेश टोपे यांनी पुढाकार घेतला असला तरी हि योजना वेंâद्राची असुन यासाठी निधी आणण्याची जबाबदारी वेंâद्रीय रेलवे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर आली आहे.गोदावरी Godavari मराठवाडा विकास महामंडळ अंतर्गत हातवन बहुतांश लघु प्रकल्प उभारला जात आहे. हातवन गावापासून ८०० मीटर अनंतराव कुंडलिका नदी पत्रावर हा प्रकल्प उभराला जात आहे. १५.२ दशलक्ष घनमीटर क्षमता या प्रकल्पाची असणार असून, या प्रकल्पामुळे ६ गावची १६९५ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. तर १८ गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटणार आहे

0 Response to " हतवन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी हालचालींना वेग, दीड हजार हेक्टर क्षेत्र येईल ओलीताखाली"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe