
आज फुलंब्री येथे ओबीसी आरक्षणासंदर्भात धरणे आंदोलन
बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१
Comment
औरंगाबाद प्रतिनिधि शेख शारुख : आज फुलंब्री येथे ओबीसी आरक्षणासंदर्भात धरणे आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र सरकारने ज्या पाच जिल्हापरिषदेच्या पोटनिवडणूक जाहीर केल्या त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले होते सरकार सरकारच्या बैठकांमध्ये सर्व पक्षी असा निर्णय करायचा ठरला होता की जोपर्यंत ओबीसी समाजाचा राजकीय आरक्षणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत कुठलेही निवडणुका घेण्यात येऊ नये पण सरकारने ओबीसी समाजाचा विश्वास घात केला आहे.
पाच जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या त्याच्या त्याच्या निषेधार्थ फुलंब्री तहसील येथे विधानसभा अध्यक्ष तथा आमदार श्री हरिभाऊ बागडे (नाना), नेतृत्वाखाली तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.त्याप्रसंगी तालुकाध्यक्ष सुहास शिरसाट श्री.शिवाजी महाराज पात्रीकर पंचायत समिती सभापती संगीता ताई फुके यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले या प्रसंगी महिला तालुकाध्यक्ष ऐश्वर्या गाडेकर उपसभापती संजय त्रिभुवन राज्याचे उपाध्यक्ष ओबीसी सेल गोपीनाथ जी वाघ जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळे सूचित बोरसे गोपाल वाघ नरेंद्र देशमुख सोमनाथ भालेराव सर्जेराव पाटील मेटे येतो बाबा जयपाल मयूर,कैलास पाटील गव्हाड उपाध्यक्ष,बाळू तांदळे ,हौसाबाई काटकर ,रत्नाताई सोनवणे,राजू भाऊ तुपे ,फारुख शेख,योगेश भाऊ मिसाळ ,गजानन नागरे ,अजय शेरकर,अजय नागरे ,आकाश वडवणी,रवींद्र काथार ,वाल्मिक जाधवयांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
0 Response to "आज फुलंब्री येथे ओबीसी आरक्षणासंदर्भात धरणे आंदोलन "
टिप्पणी पोस्ट करा