
Latest News : गणेश उत्सव कालावधीत ध्वनीप्रदुषण आणि मंडप अधिनियमाचे पालन करावे
औरंगाबाद, मा. मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिका क्रमांक 173/2010 मध्ये आदेशीत केल्यानूसार समारंभाच्या व उत्सवाच्या प्रसंगी रस्त्यावर उभारण्यात येत असलेल्या मंडप संदर्भात व ध्वनी प्रदुषण (नियमन व नियम) नियम 2000 ची अंमलबजावणी करण्याचे निर्देश शासनास देण्यात आलेले आहेत. तसेच याबाबत शासनास मार्गदर्शक तत्वे देवून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
मंडप व ध्वनीप्रदूषण विषयाचा आढावा घेऊन तपासणी करण्यासाठी तहसिलदार औरंगाबाद यांची पथक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकामध्ये महानगरपालिकेचे वार्ड अधिकारी, महसूलचे अधिकारी, पोलीस अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे. या पथकामार्फत शहरातील सर्व वार्डामध्ये स्थापन करण्यात आलेल्या गणेश मंडळाबाबत तात्काळ प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून तपासणी करून मा. उच्च न्यायालयाचे निर्देशाप्रमाणे मार्गदर्शन तत्वाचे पालन झाल्याबाबत खात्री करण्यात येईल. तसेच उल्लंघन झाल्याचे दिसून आल्यास संबंधित मंडळास आवश्यक त्या सूचना देऊन कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात येतील हे पथक गणेश मंडळाची स्थापना होण्यापूर्वीच कार्यवाही करून अहवाल सादर करील. तसेच गणेशोत्सव काळातही हे पथक तपासणी करून कार्यवाही करेल.
सर्व वार्ड अधिकारी याबाबत दक्ष राहुन कार्यवाही करण्याचे सूचना संबंधीताना देण्यात आल्या. तसेच याबाबत मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी दिलेल्या कोविड विषयक नियमाचे/सूचनाचे काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, असे रामेश्वर रोडगे,उपविभागीय दंडाधिकारी, औरंगाबाद यांनी कळविले आहे.
0 Response to " Latest News : गणेश उत्सव कालावधीत ध्वनीप्रदुषण आणि मंडप अधिनियमाचे पालन करावे"
टिप्पणी पोस्ट करा