-->
प्रधानमंत्री आवास योजनेत (ग्रामीण) औरंगाबाद जिल्हा परिषदेला प्रथम क्रमांक

प्रधानमंत्री आवास योजनेत (ग्रामीण) औरंगाबाद जिल्हा परिषदेला प्रथम क्रमांक

औरंगाबाद :- दगड मातीच्या घरात वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाच्या वतीने विविध आवास योजना राबविण्यात येतात. गरीब कुटुंबियांसाठी स्वत:चे हक्काचे सुरक्षित घर असणे ही त्यांच्यासाठी आयुष्यात महत्वपूर्ण बाब आहे. अधिकाऱ्यांनी विविध घरकुल योजना राबवतांना केवळ प्रशासकीयदृष्ट्या विचार न करता भावनिकदृष्ट्या विचार करुन काम करावे जेणेकरुन योजनेच्या कामाच ओझ वाटणार नाही असे प्रतिपादन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज येथे दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत आवास योजना विभागस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीनाताई शेळके, उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, सहायक उपायुक्त (विकास) विना सुपेकर, विभागातील सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, पंचायत समितीचे सभापती, सरपंच, ग्रामसेवक, तसेच संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

प्रत्येक स्त्री करीता घर ही हक्काची जागा असते. त्या घरात ती जीव ओतून काम करत असते आणि म्हणूनच अशा गरजू कुटुंबियांकरिता घरकुल योजनेअंतर्गत काम करताना संबंधित अधिकाऱ्यांनी वाळू उपलब्ध करुन देणे, घराचे बांधकाम दर्जात्मक करणे आदी कामे जाणिवपूर्वक जबाबदारीने केल्यास एक अधिकारी म्हणून विश्वास पात्र व्हाल असे सांगून श्री.केंद्रेकर म्हणाले की, कामगाराची घरकुल या योजनेकरिता देखील तहसिलदारांनी तात्काळ प्रस्ताव पाठवून जलदगतीने घरकुलांची कामे पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तसेच 'थोडसं माय बापासाठी' या योजनेत उस्फुर्तपणे सहभागी होण्याचे जिल्हा परिषद, ग्रामपंचातींना आवाहन केले.

उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे म्हणाल्या की, महाआवासमध्ये उस्मानाबाद जिल्हा परिषद सर्वोत्कृष्ट येण्यात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड आताचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांचे योगदान असल्याचे सांगून त्या पुढे म्हणाल्या की, घरकुल योजनेत महिलांचा मोठा सहभाग राहिला आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांत या योजनेचे भरीव काम सुरू आहे असे सांगून पंडीत दिनदयाळ उपाध्याय योजनेतंर्गत जमिन उपलब्धतेचा निधी वाढवून मिळावा याकरिता विभागीय आयुक्तांकडे त्यांनी मागणी केली. श्रीमती कांबळे यांच्या मनोगता नंतर श्री.केंद्रेकर यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार वाटप करण्यात आले. पुरस्कारामध्ये जागा उपलब्धता व वाळू उपलब्धतेबाबत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे तालुक्यांमध्ये राज्य पुरस्कृत योजनेसाठी प्रथम पुरस्कार नायगांव, जि.नांदेड तर द्वितीय पुरस्कार वैजापूर, जि.औरंगाबाद या तालुक्यांना प्रदान करण्यात आला. तर प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) साठी प्रथम पुरस्कार पैठण तर द्वितीय पुरस्कार सिल्लोड तालुक्याला देण्यात आला. वित्तीय संस्था निकषामध्ये राज्य पुरस्कृत योजना व प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) या दोन्ही निकषासाठी  प्रथम क्रमांक महिंद्रा होम फायनान्स लि. सेलू जिल्हा परभणी यांना देण्यात आला. उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारामध्ये राज्य पुरस्कृत योजनेसाठी प्रथम पुरस्कार ग्रामपंचायत चुडावा, ता.पूर्ण, जि.परभणी, द्वितीय पुरस्कार ग्रामपंचायत धानुरी, ता.लोहारा, जि.उस्मानाबाद तर तृतीय पुरस्कार ग्रामपंचायत इरळद, ता.मानवत, जि.परभणी यांचा समावेश आहे. तर प्रधानमंत्री आवास योजने (ग्रामीण) साठी प्रथम क्रमांक ग्रामपंचायत पारगावं, ता.वाशी, जि.उस्मानाबाद, द्वितीय पुरस्कारासाठी ग्रामपंचायत सावळदबरा, ता.सोयगाव, जि.औरंगाबाद, तर तृतीय पुरस्कार ग्रामपंचायत जळकीघाट, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद यांना देण्यात आला. उत्कृष्ट पंचायत समिती पुरस्कार राज्य पुरस्कृत योजनेसाठी प्रथम क्रमांक मानवत, जि.परभणी, द्वितीय क्रमांक लोहारा, जि.उस्मानाबाद, तृतीय पुरस्कार पालम, जि.परभणी यांना देण्यात आला. तर प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) प्रथम पुरस्कार खुलताबाद, जि.औरंगाबाद, द्वितीय पुरस्कार पालम, जि.परभणी, तर तृतीय पुरस्कार वाशी, जि.उस्मानाबाद यांना देण्यात आला. उत्कृष्ट जिल्हा परिषद म्हणून राज्य पुरस्कृत योजनेमध्ये प्रथम पुरस्कार उस्मानाबाद, द्वितीय पुरस्कार औरंगाबाद तर तृतीय पुरस्कार परभणी यांना देण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) साठी प्रथम पुरस्कार औरंगाबाद, द्वितीय पुरस्कार उस्मानाबाद तर तृतीय पुरस्कार हिंगोली जिल्हा परिषदेला देण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक उपायुक्त (विकास) विणा सुपेकर यांनी केले

0 Response to "प्रधानमंत्री आवास योजनेत (ग्रामीण) औरंगाबाद जिल्हा परिषदेला प्रथम क्रमांक"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe