-->
ई-पीक पाहणी प्रकल्प शेतकऱ्यांसाठी उपयुक्त–जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

ई-पीक पाहणी प्रकल्प शेतकऱ्यांसाठी उपयुक्त–जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा’ हे ब्रीद असलेल्या ई-पीक पाहणी प्रकल्पाची व्यापक जनजागृती करावी.

औरंगाबाद:  शेत पिकांची अचूक नोंदणी करणारा ई-पीक पाहणी प्रकल्प शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारा असून याची व्यापक जनजागृती आणि अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ई-पीक पाहणी प्रकल्पाबाबतच्या विभागस्तरीय अभिमुखता प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्दघाटन वेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी उपायुक्त पराग सोमण, उपजिल्हाधिकारी तथा फेरफारचे राज्य समन्वयक रामदास जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांच्या सह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांनी औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड, फुलंब्री तालुक्यांमध्ये टाटा ट्रस्टच्या सोबत ई-पीक पाहणीचा पथदर्शी प्रकल्प यशस्वीपणे राबवल्याचे सांगून शेतकऱ्यांना सातबाऱ्यात आपल्या पेरणी केलेल्या पिकांची नोंद करण्यासाठीची सुविधा उपलब्ध करुन देणारा हा उपयुक्त प्रकल्प 15 ऑगस्ट पासून राज्यव्यापी राबवण्यात येणार आहे. त्याची औरंगाबाद विभागात यशस्वी अंमलबजावणी करण्याच्या अनुंषगाने संबंधितांना विविध सूचना दिल्या.

वस्तुस्थितीदर्शक शेत पिकांची नोंदणी झाल्याने विविध नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यासाठी या नोंदी उपयुक्त ठरणार आहेत. तलाठ्यांची या प्रकल्प अंमलबजावणीतील भूमिका महत्वपूर्ण असून साधन व्यक्ती (Resource Person) म्हणून प्रभावी काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.

प्रकल्प मार्गदर्शक रामदास जगताप यांनी सविस्तररित्या ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील विविध टप्प्यांची माहिती दिली. महसूल व कृषी विभागाने एकत्रितपणे राबवायच्या या प्रकल्पात अधिकारी, शेतकरी ,यंत्रणेतील संबंधित या प्रत्येकाने काय करावयाचे आहे, आपली जबाबदारी पार पाडण्याच्या अनुषंगाने घ्यावयाच्या खबरदारी बाबत श्री. जगताप यांनी मार्गदर्शन केले.

राज्यभरात 5 ते 6 कोटी शेतकरी खातेदारांच्या खरीप हंगामाची पीक पाहणी पूर्ण करावयाची आहे. शेतकऱ्यांनी स्वत: आपल्या पिकांची माहिती ऑनलाईन नोंदवण्यासाठी ई-पीक पहणी मोबाईल ॲप तयार करण्यात आले असून 15 ऑगस्ट पासून मुख्यमंत्री यांच्या हस्ते हे सुरू होणार आहे. या प्रकल्पामुळे तलाठ्याने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पेऱ्याची नोंद घेण्याची आवश्यकता नसून शेतकऱ्यांनी स्वत:च ऑनलाईन आपल्या पीकांची नोंद घेऊन तलाठ्याला, माहिती द्यायची आहे. ‘माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा’ हे ब्रीद वाक्य असलेल्या शेतकऱ्यांना सहज सुलभतेने कृषीच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठीची आवश्यक सर्व माहिती उपलब्ध करुन देणाऱ्या या प्रकल्पाची व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना व मार्गदर्शन जगताप यांनी केले.  
यावेळी विभागातील सर्व जिल्ह्यांचे निवासी उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, तलाठी, कृषी विभागाचे तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

0 Response to "ई-पीक पाहणी प्रकल्प शेतकऱ्यांसाठी उपयुक्त–जिल्हाधिकारी सुनील चव्हाण"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe