-->
औरंगाबाद : दुकानदारांना दिलासा, रात्री ८ वाजे पर्यंत दुकान सुरु ठेवण्यास मुभा, वाचा जिल्हाधिकर्यांचे नविन आदेश

औरंगाबाद : दुकानदारांना दिलासा, रात्री ८ वाजे पर्यंत दुकान सुरु ठेवण्यास मुभा, वाचा जिल्हाधिकर्यांचे नविन आदेश

AURANGABAD LOCKDOWN

औरंगाबाद : दुकाने व आस्थापने बाबत जिल्हाधिकाऱ्यांची नवीन आदेश औरंगाबाद शहरातील कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात आटोक्यात आलेले आहे परंतु तिसरी लाटेचा खतरा टळलेला नाही. औरंगाबाद शहरातील दुकाने व आस्थापनेसाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नवीन आदेश काढलेले आहे.

शहरातील अत्यावश्यक दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहतील तसेच प्रत्येक दुकान वर काम करणारे मालक व कर्मचारी यांना RTPCR टेस्ट सोबत ठेवणे गरजेचे असेल. आरटीपीसीआर टेस्ट ची वैधता किमान पंधरा दिवस राहील.

अत्यावश्यक सेवा व दुकाने वगळता सर्व दुकाने व आस्थापने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहतील व शनिवारी ही दुकाने व आस्थापना दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा दिलेली आहे. परंतु ही दुकाने रविवारी संपूर्णपणे बंद राहतील

हॉटेल व रेस्टॉरंट साठी सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेवर बसून जेवन करण्यास सूट राहतील.

कार्यालयीन उपस्थिती: शासकीय निमशासकीय व खाजगी आस्थापने पूर्णक्षमतेने सुरू राहतील यामध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे असेल.

क्रीडा पूर्णपणे सुरू राहतील तसेच जिम, हेअर सलून हे सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहतील व रविवारी हे आस्थापने पूर्णपणे बंद राहतील

वाढदिवस स्नेहसंमेलन इत्यादी कार्यक्रम पचास टक्के क्षमतेने सोमवार ते शुक्रवार सुरू राहतील परंतु यात गर्दी होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे असेल.

0 Response to "औरंगाबाद : दुकानदारांना दिलासा, रात्री ८ वाजे पर्यंत दुकान सुरु ठेवण्यास मुभा, वाचा जिल्हाधिकर्यांचे नविन आदेश "

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe