
चोरी गेलेला मोबाइल परत मिळवून दिला, औरंगाबाद शहर पुलिसची कामगिरी
औरंगाबाद : थोडक्यात हकीगत अशी की, दि.०५/०७/२०२१ रोजी ०२.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी नामे भगवान हरीभाऊ लोणकर रा. राजनगर, पहाडसिंगपुरा, औरंगाबाद हे आपल्या राहते घरी घरासमोरील गॅलरीमध्येझोपलेले असतांना त्यांचा ४०००/ - रुपये किमतीचा एक MI कंपनीचा गोल्डन रंगाचा मोबाईल हॅन्डसेट एक अनोळखी इसम चोरुन घेवुन पळुन गेला त्यानंतर फिर्यादी व शेजारील काही लोक त्याच्या मागे पळाले असता काही अंतरावर एक इसम मोटार सायकल घेवुन उभा होता त्याच्या गाडीचा नंबर MH२०FA२७२६ असा दिसला सदर मोसा क्रमांक व मोबाईल चोरुन घेवून पळुन जाणारा इसम हा त्याचे मोसावर बसत असतांना फिर्यादी व शेजारील लोकांनी बॅटरीच्या उजेडात पाहिले असता हाच मोसा क्रमांक असल्याचे त्यांचे निदर्शनास आले. परंतु हे लोक त्याच्या जवळ पोहचे पर्यंत दोघे जण मोटर सायकल वर बसुन पळुन गेले त्यांनी सांगितलेल्या वर्णणावरुन व घटनेवरुन सदरचा गुन्हा आज रोजी १६.४९ वा. गुरन ३३५/२०२१ कलम ३७९ ,३४ भादवि अन्वये दाखल झाला होता. त्यानंतर पुढील तपासाची चक्रे फिरवत पोनि श्री सचिन सानप यांनी स्वत: लक्ष घालुन विशेष तपास पथकाला आदेश देवुन सदर आरोपीना तात्काळ शोधण्यासाठी नियोजन केले. त्यानुसार गोपनीय बातमीदारांना सक्रिय करुन सदर मोसा क्रमांक व आरोपींचे वर्णन सांगितले त्यानंतर गोपनीय बातमीदाराने दिलेल्या माहिती नुसार सदर क्रमांकाची मोसा व सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे मिळते जुळते इसम हे संजय नगर, बायजीपुरा या भागात मोसा क्र. MH२०FA२७२६ यावर संशयीतरित्या बसलेले मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवुन पोस्टेला आणले. सदर गुन्ह्याबाबत त्यांना विचारपुस केली असता मोसा वरिल मुलगा नामे शेख अरबाज उर्फ शाहरुख अन्वर शेख वय १७ वर्षे, रा. इंदिरानगर बायजीपुरा,औरंगाबाद असे सांगुन त्याने सदर गुन्ह्यातील मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात सदर गुनह्यातील चोरलेला एक MI कंपनीचा मोबाईल मिळुन आला. म्हणुन सदर गुन्ह्यातील फिर्यादीला पोस्टेला बोलावुन त्याला सदर मोबाईल दाखवला असता त्याने सदर मोबाईल त्याचा असल्याचे सांगुन व सदर मोबाईल चोरुन घेवुन पळुन जाणारा मुलगा हाच असल्याचे सांगितले तसेच सदर मुला सोबत असलेल्या इसमास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख रईस अब्दुल रशीद शेख वय ३८ वर्षे रा. संजयनगर, बायजीपुरा , औरंगाबाद असे सांगितल्याने सदर गुन्हा करुन त्याचे मोसावर दोघेही बसुन पळुन गेल्याचे सांगितले त्यांच्या ताब्यातुन मिळुन आलेला MI कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट व मोसा क्र. MH२०FA२७२६ हे जप्त करण्यात आले आहे. सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर श्री निखील गुप्ता साहेब, मा. पोलीस उप आयुक्त श्री निकेश खाटमोडे पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री विवेक सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री सचिन सानप, सपोनि श्री अहेमद शेख, पोउपनि श्री विशाल बोडखे, पोना/१०९४ शेख, पोशि/१२४१ नजन, पोशि/९६९ चव्हाण यांनी केली आहे.
0 Response to "चोरी गेलेला मोबाइल परत मिळवून दिला, औरंगाबाद शहर पुलिसची कामगिरी "
टिप्पणी पोस्ट करा