-->
कोरोनाच्या लाटामध्ये शिवसैनिकांची भक्कम वज्रमूठ - शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

कोरोनाच्या लाटामध्ये शिवसैनिकांची भक्कम वज्रमूठ - शिवसेना नेते चंद्रकांत खैरे


औरंगाबाद : शहरात शिव जनसंपर्क अभियानास सुरुवात , कोरोनाचे संकट अद्यापही संपलेले नाही, त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. गेल्या दीड वर्षांत शिवसैनिकांचे कार्य कौतुकास्पद आहे. व यापुढे कोरोनाच्या लाटामध्ये शिवसैनिकांची वज्रमूठ भक्कमपणे राहील, असा विश्वास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला. शिवसेना संभाजीनगर शाखेच्यावतीने शिव जनसंपर्क अभियानास आज सुरुवात झाली, त्याप्रसंगी ते बोलत होते.

पश्चिम विधानसभा मतदार संघातील सातारा - देवळाई, बीड - बायपास, ज्योतिनगर, श्रेयनगर, क्रांती चौक, उस्मानपुरा, प्रतापनगर भागातील पदाधिकारी यांचा आढावा घेतला. तसेच या भागातील स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.


यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख त्रिम्बक तुपे, महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, शहरप्रमुख विजय वाघचौरे, माजी महापौर गजानन बारवाल, विकास जैन, नगरसेविका सीमा चक्रनारायण, सुमित्रा हाळनोर, गिरीजाराम हाळनोर, सुभाष शेजवळ, महिला आघाडीच्या सुनीला क्षत्रीय, प्रज्ञा जठार, सपर्ण चिंतलवाल, उपशहरप्रमुख अंबादास मस्के, रमेश बाहुले, रतनकुमार साबळे,  संजय बारवाल, अनिल मुळे, सतीश निकम, हरिभाऊ हिवाळे, संजय पवार, विभागप्रमुख सुरेश गायके, राहुल येलदी, संदीप बनगर, विजय यादव,सुनील शिंदे, गणेश जाधव, विक्रम खडके, बाबासाहेब आगळे, शिवाजी शिंदे, अमोल निकाळजे, देविदास रत्नपारखी, ईश्वर पारखे, संतोष जाटवे,मनोज खोचे, मनोज सोनवणे, संतोष कांबळे, पवन जैस्वाल, सुधीर चौधरी, नंदू लबडे, अविनाश कुलकर्णी, संतोष बोर्डे, अभिजित पगारे, दिनेश तिवारी, स्वप्नील साबळे, महेंद्र जहागीरदार, नितीन पवार, पंकज वाडकर आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.

0 Response to "कोरोनाच्या लाटामध्ये शिवसैनिकांची भक्कम वज्रमूठ - शिवसेना नेते चंद्रकांत खैरे"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe