-->
महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यांमध्ये निर्बंधात शिथिलता, 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम- वाचा सविस्तर माहिती

महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यांमध्ये निर्बंधात शिथिलता, 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम- वाचा सविस्तर माहिती

राज्यातील 25 जिल्ह्यांमधील लॉकडाऊन शिथिल करण्याविषयी निर्णय घेण्यात आला आहे, महाराष्ट्रचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत 29 जुलै रोजी महत्वाची बैठक झाली. निर्बंध मध्ये शिथिलता असल्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.राज्याचे अर्थचक्र चाललं पाहिजे यासाठी शिथिलता गरजेची आहे. काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची आकडेवारी कमी आहे. 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालये सुरु करता येतील पण एसीचा वापर नसावा. दुसरीकडे रेस्टॉरंट, सलून पार्लर हळूहळू जास्त संख्येने सुरु करता येतील. शनिवार आणि रविवार पैकी आता शनिवारी संध्याकाळी सर्व व्यवहार सुरु ठेवता येऊ शकेल. असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. 

निर्बंध शिथिल झालेल्या जिल्ह्यांची नावे-
मराठवाड्यातील परभणी, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, उस्मानाबाद तर विदर्भातील अमरावती, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशीम, हिंगोली तर कोकणातील  रायगड, ठाणे, मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक

तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकणात रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, मराठवाड्यात बीड आणि उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये निर्बंध कायम राहतील

0 Response to "महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यांमध्ये निर्बंधात शिथिलता, 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम- वाचा सविस्तर माहिती "

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe