
मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा लिपिक व तत्सम संवर्गाची परीक्षा घेण्यास विविध मजदूर युनियन कडून जाहीर निषेध
मुंबई : महानगरपालिका प्रशासनाचा लिपिक व तत्सम संवर्गाची परीक्षा घेण्याच्या विविध मजदूर युनियन कडून जाहीर निषेध तसेच परीक्षा न घेता विनाअट कालबद्ध पदोन्नती मिळालीच पाहिजे ही प्रमुख मागणी केंद्र सरकार कर्मचारी राज्य सरकार कर्मचारी व इतर मनपाच्या कर्मचाऱ्यांना विनाअट मीना परीक्षा 10,20,30 कालबद्ध पदोन्नती दिली जाते परंतु फक्त मुंबई महापालिकेच्या लिपिक व तत्सम संवर्गाच्या कर्मचाऱ्यावर हा अन्याय का ? असा प्रश्न विचारला आहे.
मुख्य लिपिक वरिष्ठ लेखापाल व लेखा सहाय्यक प्रमुख लेखापाल खाते या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या परीक्षेचा निकाल एम पी एस सी च्या धरतीवर लावून फक्त पाच टक्के निकाल लावून 95 टक्के लिपिक व तत्सम संवादावर अनुत्तीर्ण करण्यामागचा शासनाचा हेतू काय ?
- प्रमुख मागण्या
मुख्य लिपिक वरिष्ठ लेखा परीक्षण व लेखा सहाय्यक या पदासाठी दिनांक 06-08-2021 ते 08-08-2021 या दरम्यानच्या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात यावी.
मुख्य लिपिक वरिष्ठ लेखा परीक्षा व लेखा सहाय्यक वरिष्ठ लेखा परीक्षा या पदाच्या कालबद्ध पदोन्नती साठी लिपिकीय संवर्गासाठी असलेली खात्यांतर्गत परीक्षा उत्तीर्ण होण्याची असलेली अट शिथिल करून त्यांना कालबद्ध पदोन्नती देण्यात यावी. अशी मागणी विविध मजदूर युनियन यांनी केली आहे.
0 Response to "मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा लिपिक व तत्सम संवर्गाची परीक्षा घेण्यास विविध मजदूर युनियन कडून जाहीर निषेध"
टिप्पणी पोस्ट करा