-->
*महामानवाच्या आदर्श जयंती उत्सवानिमित्त भव्य सर्वरोगनिदान मोफत आरोग्य शिबीर संपन्न.* *सर्वपक्षीय आंबेडकरवादी सार्वजानिक जयंती उत्सव समिती*

*महामानवाच्या आदर्श जयंती उत्सवानिमित्त भव्य सर्वरोगनिदान मोफत आरोग्य शिबीर संपन्न.* *सर्वपक्षीय आंबेडकरवादी सार्वजानिक जयंती उत्सव समिती*

 

नितीन दाभाडे :- आज दि.१०/४/२४ बुधवार रोजी महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी सर्वपक्षीय आंबेडकरवादी जयंती उत्सव समिती शहर-जिल्हा छत्रपती संभाजीनगरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले जात आहेत,आज फूलेनगर उस्मानपुरा येथे महानगरपालिका आरोग्य विभाग व जयंती उत्सव समितीच्या वतीने शहर वासियांच्या निरोगी आरोग्यासाठी भव्य सर्वरोगनिदान मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते, क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून या भव्य शिबीरास सुरुवात करण्यात आली.उपस्थीत सर्व तज्ञ डॉक्टरांचे उत्सव समितीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी तज्ञ डॉक्टर प्रेरणा संकलेचा (आरोग्य अधिकारी), डॉ.उन्मेश टाकळकर (संचालक सिग्मा हाॅस्पीटल), डॉ.प्रफुल जटाळे(थेराॅंट तज्ञ)डाॅ.आशा उनवणे(स्त्रीरोग व बालरोग तज्ञ) डॉ.ज्ञानेश्वर लोखंडे(जनरल‌ फिजीशियन) डॉ.सुनिल धुळे(एम डी मेडीसीन) डॉ.परीक्षीत सातपुते (त्वचा रोग तज्ञ) डॉ.सुभाष पांडव,डॉ.वंदना सातपुते,व लॅब टॅक्निशीयन, असिस्टंट,सिष्टर्स,आशा सेविका ताईंची उपस्थिती होती.यावेळी आलेल्या नागरिकांची सर्व प्रकारच्या आरोग्य तपासणी तज्ञ डॉक्ट‌‌‌राकडुन करून त्यांना मोफत औषधीही वाटप करण्यात आली.यावेळी शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.अशा प्रकारचे अनेक सामाजिक उपक्रम शहर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे*. तसेच गरजू विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप, मोफत आरोग्य शिबिरे, संविधान जनजागृती अभियान, अशा प्रकारचे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.यावेळी या.प्रकाशदादा निकाळजे (मा.उपमहापौर)मा.सोमनाथ जाधव (पोलीस निरीक्षक) मा.विनोद अबुज (पोलीस उपनिरीक्षक),मनोज अंभोरे(लाइंस क्लब)विनोद बनकर,एन.एस.कांबळे,ऍड.दिपक म्हस्के,मोहनमामा म्हस्के,जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दिपक निकाळजे,अरविंद कांबळे,अमित वाहुळ,अनिल बिरारे, विशाल इंगळे, सचिन जोगदंड, आनंद कस्तुरे,काकासाहेब काकडे,मुकेश खोतकर, अनामी मोरे,त्रिसरण गायकवाड, संतोष चव्हाण, नितीन निकाळजे, सिद्धार्थ सूर्यवंशी,नितीन सूर्यवंशी, नितीन आदमाने,आकाश ओंकार, स्वप्निल शिरसाट, नितीन काटे,सिद्धार्थ जाधव, दादाराव सोनटक्के, राम पाखरे, गौरव मगरे, शुभम नवगिरे,आठवले साहेब, संदीप जाधव,लखन सूर्यवंशी, सिताराम आमराव, नाना नवतुरे,शुभम खिल्लारे विक्की साबळे,अजय आराक व सामाजिक चळवळीत निष्ठेने काम करणारे भीमसैनिक, उपासक,उपासिका,व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

0 Response to "*महामानवाच्या आदर्श जयंती उत्सवानिमित्त भव्य सर्वरोगनिदान मोफत आरोग्य शिबीर संपन्न.* *सर्वपक्षीय आंबेडकरवादी सार्वजानिक जयंती उत्सव समिती*"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe