-->
वडिलांच्या वाढदिवशीच मुलाचा परदेशात झाला अपघाती मृत्यू

वडिलांच्या वाढदिवशीच मुलाचा परदेशात झाला अपघाती मृत्यू


             

फुलंब्री : वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर दुपारी मुलाचा अपघात झाला. त्यात त्याचा मृत्यू झाला, तर सून गंभीर जखमी झाल्याची माहिती वडिलांना सायंकाळी समजली. ही घटना मॉरिशसला ६ जून रोजी दुपारी घडली. युवकाचा मृतदेह गुरुवारी रात्री मुंबईत येणार असून, शुक्रवारी सकाळी ९.३० वा. खामगावात (ता. फुलंब्री) अंत्यसंस्कार होतील.अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे ऋषिकेश मोहन सोनवणे (२६) असे नाव आहे. ऋषिकेशचा विवाह २४ मे रोजी डॉ. सायली यांच्याशी झाला होता. विवाहानंतर हे दाम्पत्य एका मित्राच्या जोडीसोबत मॉरिशस येथे फिरण्यासाठी १ जून रोजी गेले होते. ७ जून रोजी भारतात हे चौघेही परतणार होते. ६ जून रोजी सकाळी ऋषिकेशने वडीलांना फोन करूनशुभेच्छा दिल्या.दोघांतील हा संवाद शेवटचाच ठरला. त्यानंतर दुपारी ४ वाजता झालेल्या भीषण अपघातात ऋषिकेशसह चालकाचा मृत्यू झाला. चारचाकी गाडीमध्ये ऋषिकेश समोर बसलेला होता. पाठीमागे तिघेजण बसलेले होते. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर वडील मोहन सोनवणे, एस. पी. मोरे मृताचा भाऊ अभिलाष सोनवणे, अजहर पटेल हे तत्काळ दिल्लीला रखना झाले. त्याठिकाणी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी मदत केल्यानंतर सर्वजण मॉरिशसला रवाना झाले. त्याठिकाणी सर्व प्रक्रिया पूर्ण करून गुरुवारी रात्री मृतदेह मुंबईत आणण्यात आला. तेथून मृतदेह शुक्रवारी सकाळी खामगाव पोहचणार असल्याचे नातेवाईकांनी कळविले आहे.    

शिक्षण संस्थांसह कंपनीचा कारभारी मृत ऋषिकेश याचे वडील मोहन पाटील सोनवणे हे गोरक्ष शैक्षणिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे कार्याध्यक्ष आहेत. • ऋषिकेश हा गोरक्ष संस्थेचा कार्यकारी अधिकारी होता. तोच सर्व महाविद्यालयांचा कारभार पाहत होता. त्याशिवाय शेंद्रा एमआयडीसीतील अलोक प्रा. इंजिनिअर कंपनीचे कामही ऋषिकेश हाच पाहत होता, असे नातेवाईकांनी सांगितले.

0 Response to "वडिलांच्या वाढदिवशीच मुलाचा परदेशात झाला अपघाती मृत्यू"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe