
इगतपुरीजवळ भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
बुधवार, ८ मार्च, २०२३
Comment
नाशिक : मुंबई आग्रा महामार्गावर इगतपुरी जवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील ४ जण जागेवरच ठार झाल्याची घटना घडली आहे.या अपघातात १ जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास पंढरपुरवाडी समोर नाशिकहुन मुंबईच्या दिशेने जाणारी एसेंट कार एम एच ०४ एफ ए ८२९१ ही गाडी भरगाव वेगाने जात होती. यावेळी अचानक गाडीचा पुढील टायर फुटल्याने ही कार थेट उडाली.ही कार मुंबईहुन नाशिककडे अपघातग्रस्त वॅगनर कार घेऊन जाणाऱ्या टोइंग व्हॅनवर जोरदार आदळल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील १ बालिका, १ महिला व २ पुरुष जागेवर ठार झाल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच इगतपुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतांची नावे अद्याप समजू शकली नाही.
0 Response to " इगतपुरीजवळ भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ४ जण ठार"
टिप्पणी पोस्ट करा