
परिचारिका संपावर आहे, रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पहावी लागत आहे वाट
बुधवार, १५ मार्च, २०२३
Comment
औरंगाबाद: घाटी रुग्णालयातील नियोजित शस्त्रक्रिया दुसऱ्या दिवशीही ठप्प राहिल्या. केवळ तातडीच्या शस्त्रक्रिया करण्यावर भर देण्यात येत आहे. परिचारिका, चतुर्थश्रेणी कर्मचारी संपावर असल्याने रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी वाटच पहावी लागत आहे.परिचारिका आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी दुसऱ्या दिवशी, बुधवारीदेखील संपावर आहेत. त्यामुळे घाटी रुग्णालयात रुग्णांचे हाल सुरूच आहेत. अधिष्ठाता डाॅ. संजय राठोड यांनी बुधवारी बैठक घेतली. यावेळी कंत्राटी स्वरुपात काही परिचारिका आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी घेण्यावर चर्चा करण्यात आली. मंगळवारी काही कंत्राटी कर्मचारी संपावर होते. त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. हे कंत्राटी कर्मचारी बुधवारी कामावर हजर झाले. मात्र, कायमस्वरुपी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांअभावी स्वच्छतेच्या कामावर परिणाम होत आहे. जागोजागी अस्वच्छता पहायला मिळत आहे. तसेच नातेवाईकच स्ट्रेचर ओढत असल्याचे पहायला मिळत आहे. परिचारिकांच्या कामाची धुरा नर्सिंगचे विद्यार्थी सांभाळत आहेत.
0 Response to "परिचारिका संपावर आहे, रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पहावी लागत आहे वाट "
टिप्पणी पोस्ट करा