%20(4).jpeg)
फुलंब्रीमध्ये आज सकाळपासून ढगाळ वातावरण
गुरुवार, १६ मार्च, २०२३
Comment
फुलंब्री लोकसवाल न्यूज प्रतिनिधी औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या पावसामुळे आज फुलंब्रीमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून काही भागात पावसाच्या सरीही कोसळल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान, सकाळपासून सूर्यदर्शनही झाले नाही. तापमानात वाढ होत असतानाच अचानक पाऊस कोसळत असताना आरोग्याच्याही समस्या वाढल्या आहेत. बुधवारी रात्रीपासूनच शहरासह ग्रामीण भागात विजेच्या कडकडासह पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
0 Response to "फुलंब्रीमध्ये आज सकाळपासून ढगाळ वातावरण "
टिप्पणी पोस्ट करा