
समृद्धी महामार्गावर कारला भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, ७ जखमी
रविवार, १२ मार्च, २०२३
Comment
लोकसवाल न्यूज प्रतिनिधी. समृद्धी महामार्गावर वाहनांच्या सुसाट वेगामुळे अपघातांचा वेगही सुसाट झाला आहे. याच मार्गावर आज पुन्हा एकदा अपघात झाला आहे. जिल्ह्यात मेहकरजवळ कारला भीषण अपघात झाला. या अपघातात ५ जण ठार, तर ७ जण जखमी झाले आहेत.समृद्धी महामार्गावर अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे समृ्द्धी महामार्ग मृत्यूचा सापळा बनतोय की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. समृद्धी महामार्गावर आज झालेल्या एका भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. वेगवान कार उलटून हा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही कार औरंगाबादहून शेगावला जात होती. गाडीत एकूण ९ प्रवासी होते. मेहकरजवळ सिवनी पिसा गावाजवळ नागपूर कॉरिडॉरवर गाडीचा अपघात झाला.या भीषण अपघातातील मृतांमध्ये २ मुले आणि ३ महिलांचा समावेश आहे. तर ७ गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. हे सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातामुळे वाहतुकीचा वेगही मंदावला होता. बघ्यांची गर्दीही मोठ्या प्रमाणात जमली होती.
0 Response to "समृद्धी महामार्गावर कारला भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, ७ जखमी"
टिप्पणी पोस्ट करा