
सिल्लोड येथे कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते
लोकसवाल न्यूज/सिल्लोड येथे कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी शेतकरी बांधवांच्या विविध स्टॉल्सना भेट देत संवाद साधला.
राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीपद्धतीकडे वळावे तसेच कृषी क्षेत्रात सुरू असलेले अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग आणि बदल त्यांच्यापर्यंत पोहचावेत या उद्देशाने या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना भेट देऊन कृषी क्षेत्रातील अनेक नवीन संकल्पना जाणून घेतल्या.
संपूर्णपणे वेगळ्या रंगाच्या कापसापासून तयार केलेला कोट यासमयी एका शेतकऱ्याने मला परिधान करण्यास दिला. तसेच शेतकऱ्यांचे कष्ट कमी करून जास्त उत्पादन घेण्यासाठी अवलंबण्यात येणाऱ्या नवीन कल्पनांची माहिती देखील यावेळी जाणून घेतली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्यादृष्टीने राज्यातील शेतकऱ्यांनीही तृणधान्याची अधिकाधिक लागवड करावी यासाठी या कृषी प्रदर्शनात भर देण्यात आला होता.
याप्रसंगी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, फलोत्पादन तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, खासदार इम्तियाज जलील, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले तसेच कृषी विभागाचे सर्व संबंधित अधिकारी
आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.
0 Response to "सिल्लोड येथे कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते"
टिप्पणी पोस्ट करा