-->
औरंगाबाद देवगिरियन ट्रेकर्स गड-किल्ले प्रेमिनचा 5001 वृक्ष लागवडीचा संकल्प

औरंगाबाद देवगिरियन ट्रेकर्स गड-किल्ले प्रेमिनचा 5001 वृक्ष लागवडीचा संकल्प

औरंगाबाद येथील गड-किल्ले जतन संवर्धन संस्था देवगिरीयन् ट्रेकर्स, औरंगाबाद व परभणी जिल्हा मित्र मंडळ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने सामाजिक दायित्वातून ५००१ वृक्ष लागवड संवर्धन, संरक्षण हा संकल्प करत आहे. निसर्गाप्रती उतराई म्हणून किंवा निसर्गाशी एकरुपता साधन्यासाठी औरंगाबाद शहरातील प्राध्यापकांची गड-किल्ले जतन संवर्धन ही संस्था आता वृक्ष लागवडीचा व वृक्ष संरक्षण करणे ही कृतज्ञ भावना व्यक्त करत आहे.

'कृतज्ञता' तसा हा भारतीय संस्कारच आणि गड-किल्ले ही महाराष्ट्राची प्राचीन संस्कृती होय! त्या प्रती या संस्थेने मागील २४/२५ वर्षापासून देवगिरीयन् ट्रेकर्स च्या माध्यमातून गड-किल्ल्यांची कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. उद्घाटन प्रसंगी साहेब (केंद्रीय अर्थराज्यमंत्री भारत सरकार) तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष-मा. आमदार या वृक्ष लागवडी उद्घाटक म्हणून मा.ना.डॉ.भागवत कराड, सतीश चव्हाण (मराठवाडा पदवीधर विभाग) उपस्थित राहणार आहेत. उपरोक्त संस्था इतिहास व सांस्कृतिक वारसा, दुर्ग-किल्ले प्रेमी यांनी एकत्र येऊन स्थापन केलेली असून याद्वारे ऐतिहासिक शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणाशी निगडीत विविध सामाजिक उपक्रम राबवत असते. त्याचाच एक भाग म्हणून वृक्ष लागवड हा स्पष्ट उद्देश ठेवून उपक्रमाचे आयोजन करत आहे. 

आम्हाला समाजाने खूप काही दिलेले आहे, त्या समाजाची कृतज्ञता व्यक्त करणेसाठी आणि आमच्या विद्यार्थी दशेत ज्या गुरुजनांनी संस्कार केलले आहेत त्या सर्वांचा सत्कार या समारंभात होणार आहे. हा सोहळा आपल्या अजूबाजूच्या परिसरातील पर्यावरण प्रेमींना प्रेरणादायी ठरणार आहे. आपल्या शहराचे ऐतिहासिक महत्व देश-विदेशातुन येणार्या पर्यटकांना/नागरिकांना लक्षात यावे म्हणून हा उपक्रम होत आहे. दि. १८ सप्टेंबर शनिवार सायं. ४.०० वा. प्लॉट नं. ३६ तिरुपती इंडस्ट्रीज, एस.टी. वर्क शॉप शेजारी एम.आय.डी.सी. चिकलठाणा येथे संपन्न होत आहे. तरी सर्व निसर्ग प्रेमींनी या सोहळ्यास उपस्थित असावे असे आवाहन करण्यात येत आहे.


0 Response to "औरंगाबाद देवगिरियन ट्रेकर्स गड-किल्ले प्रेमिनचा 5001 वृक्ष लागवडीचा संकल्प"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe