-->
औरंगाबाद : कोविड 19 मधील मृत्यू पावलेल्या वारसदारास व्यवसायाकरीता 5 लाख रूपाचे कर्ज- वाचा सविस्तर माहिती

औरंगाबाद : कोविड 19 मधील मृत्यू पावलेल्या वारसदारास व्यवसायाकरीता 5 लाख रूपाचे कर्ज- वाचा सविस्तर माहिती

औरंगाबाद : राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली यांच्यामार्फत अनुसूचित जातीतील चर्मकार समाजासाठी महामारीमुळे  Support for Marginalized Indivduals for Livelihoods and Enterprise (SMILE) नवीन योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे.

कोविड-19 या महामारीमुळे ज्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती (Breadearner) मृत्यू पावली आहे. अशा कुटुंबातील प्रमुख वारसदारास NSFDC नवी दिल्ली यांच्या मार्फत रु.5 लाखांपर्यंत व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना आहे. त्यामध्ये एनएसएफडीसी कर्ज रू. 4 लाख त्यास 6 टक्के व्याजदर आणि भांडवली अनुदान रु.एक लाख याचा समावेश आहे.यासाठी मयत व्यक्तीचे नाव, संपूर्ण पत्ता, आधार क्रमांक, जन्मतारीख, लिंग जात, पोटजात, मृत्यूचा दिनांक, रेशनकार्ड, मयत झालेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, कुटुंबातील व्यक्तींची एकूण संख्या, कुटुंबातील प्रमुख वारसदार, कुटुंबातील व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न रु.3.00 लाखाच्या आत असणे आवश्यक आहे.

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील व्यक्तीने संबंधित माहिती महामंडळाच्या जिल्हा कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शिवाजी हायस्कूल शेजारी, खोकडपुरा, औरंगाबाद या ठिकाणी कार्यालयीन वेळेत सादर करावेत. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संगिता पराते यांनी केले आहे.

सोबत लिंक -https://forms.gle/Q485fSuQYEuL4xUx7  देखील पहावी, असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक संगीता पराते यांनी कळविले आहे.


0 Response to "औरंगाबाद : कोविड 19 मधील मृत्यू पावलेल्या वारसदारास व्यवसायाकरीता 5 लाख रूपाचे कर्ज- वाचा सविस्तर माहिती "

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe