-->
औरंगाबाद : अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय शनिवार आणि रविवार पूर्णपणे बंद, वाचा सविस्तर माहिती

औरंगाबाद : अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय शनिवार आणि रविवार पूर्णपणे बंद, वाचा सविस्तर माहिती

औरंगाबाद : राज्यातील Delta Plus Variant चा संभावित संसर्गाचा धोका लक्षात घेऊन कोविड-19 संसर्ग साखळी तोडणे (Levels of Restrictions for Safe Maharashtra) नुसार सर्व जिल्हयांना Level-3 च्या दिलेल्या निर्बधाच्या सुधारित अटी व शर्तीचा अवलंब अनिवार्य करणे बाबत निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगाने नागरिकांनी सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.

औरंगाबाद जिल्हयातील कोविड-19 विषयक बाधित परिस्थिती लक्षात घेऊन व प्राप्त वैद्यकीय अहवालाच्या आधारे जिल्हयातील शहरी रुग्णांची टक्केवारी 1.31 टक्के (Positivity)व ग्रामीण रुग्णांची टक्केवारी 2.59 टक्के (Positivity) ऐवढी असून एकूण औरंगाबाद जिल्हयांतील रुग्णांची टक्केवारी 2.13 टक्के (Positivity) असून व्यापलेल्या ऑक्सीजन बेडची औरंगाबाद शहराची टक्केवारी 6.39 टक्के व ग्रामीण बेडची टक्केवारी 2.96 टक्के अशी एकूण ऑक्सीजन बेडची औरंगाबाद शहराची टक्केवारी 6.02 टक्के आहे . जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, औरंगाबाद, पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर व महानगरपालिका आयुक्त औरंगाबाद यांच्या संयुक्त स्वाक्षरीने औरंगाबाद जिल्हा क्षेत्राकरिता 29 जुन रोजीचे सकाळी 07.00 वाजेपासून पुढील आदेशापर्यंत खालीलप्रमाणे निर्बंध बाबत (Levels of Restrictions for Safe Maharashtra) आदेश लागू करण्यात येत असल्याचेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

विशेष सूचना : सांयकाळी 5.00 वाजेपर्यंत जमावबंदी व नंतर सकाळी 7.00 वाजेपर्यंत संचारबंदी. संपूर्ण आठवडाभर सायंकाळी 05.00 वाजेनंतर नागरिकांच्या संचारावर कडक नियंत्रण असेल.

निर्बंधांबाबत सुचना

1.सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना, विशेष सूचना : सांयकाळी 5.00 वाजेपर्यंत जमावबंदी व तदनंतर सकाळी 7.00 वाजेपर्यंत संचारबंदी. .संपूर्ण आठवडाभर सायंकाळी 05.00 वाजेनंतर नागरिकांच्या संचारावर कडक नियंत्रण असेल.

2.अत्यावश्यक वस्तू व सेवा संबंधी व्यवसाय व दुकाने दररोज सकाळी 07.00 ते सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत

3.अत्यावश्यक वस्तू व सेवा व्यतीरिक्त इतर सर्व व्यवसाय व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते 04.00 वाजेपर्यंत शनिवार आणि रविवार पूर्णपणे बंद

4.मॉल्स / चित्रपटगृहे / नाटयगृहे पूर्णपणे बंद

5.रेस्टॉरंट, हॉटेल्स, खानावळी, शिवभोजन थाळी, सोमवार ते शुक्रवार (Week Days) सकाळी 07.00 ते सायंकाळी 04.00 या वेळेत 50% आसन क्षमतेनुसार Dining सायं. 4.00 नंतर पार्सल सेवा चालू राहिल व शनिवार आणि रविवार (Weekend) फक्त पार्सल व होम डिलेवरी सुविधा चालू राहतील.

6.सार्वजनिक ठिकाणे/क्रीडांगणे,मोकळ या जागा, उद्याने /बगिचे, Morning Walk व सायकलींग दररोज सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 वाजेपर्यंत

7.खाजगी आस्थापना, सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत शासन आदेश दिनांक 04 जून 2021 च्या निर्देशानुसार वगळण्यात आलेल्या सर्व आस्थापना जसे, खाजगी बँका, विमा, औषध कंपनी, सुक्ष्म वित्त संस्था व गैर-बँकींग वित्त-संस्था इ. कार्यालये नियमीतपणे कार्यालयीन वेळेपर्यंत सुरु राहतील.

8.कार्यालयीन उपस्थिती, शासकीय/निमशासकीय/खाजगी इतर कार्यालये क्षमतेच्या 50% कोरोना विषयक कामे करणा-या आस्थापना, कृषी, बँक मान्सुनपूर्व कामांशी संबंधित यंत्रणा, कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु राहतील.

9.क्रीडा, बाहेर मोकळया जोगत (Out Door) सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 व सायंकाळी 06.00 ते रात्री 09.00 या वेळेत.

10. चित्रीकरण (Shooting),सायंकाळी 4.00 वाजे पर्यंत मुभा सायंकाळी 05.00 वाजेनंतर कुठेही वावरण्यास मनाई  (No Movement Outside Bubble)

11.स्नेहसंमेलने(Gathering), सामाजिक, सांस्कृतिक, करमणुकीचे कार्यक्रम
सोमवार ते शुक्रवार सभागृह/ हॉल / मैदान आसन क्षमतेच्या 50% उपस्थितीत सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत

12.विवाह संमारंभ, 50  लोकांच्या उपस्थितीत

13.अंत्यविधी, 20 लोकांच्या उपस्थितीत

14.सभा / निवडणुका, स्थानिक प्राधिकरण व सहकारी संस्था यांचे आमसभा, सभागृह / हॉल / मैदान आसन  क्षमतेच्या 50%

15.बांधकाम, फक्त बांधकाम साईटवर निवासी/वास्तव्यास मुभा, बाहेरुन मजूर आणण्याचे बाबतीत सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत

16.कृषी संबंधीत बाबी, संपूर्ण आठवडाभर सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत

17. ई-कॉमर्स वस्तु व सेवा, नियमित पूर्ण वेळ : दररोज

18.जमावबंदी/संचारबंदी,

  •  जमावबंदी (5 पेक्षा जास्त व्यक्तीस एकत्र येण्यास मज्जाव) सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत,
  • संचारबंदी सायंकाळी 05.00 नंतर (फक्त अत्यावश्यक कामांसाठी मुभा)

19.जीम/ सलुन/ ब्युटी पार्लर / स्पा/ वेलनेस सेंटर, दररोज सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत क्षमतेच्या 50%
पूर्व- परवानगीसह (Appointment), ए.सी. च्या वापरास मनाई.

20.जलतरण तलाव (Swimming Pool), क्रीडा-संकुल (Sports Complex), स्‍वंतत्र जलतरण तलाव, जीम , हॉटेल्‍स यांना संलग्‍नीत सर्व जलतरण तलाव पूर्णपणे बंद राहतील.

21.सार्वजनिक बस वाहतूक, पूर्ण आसन क्षमतेने परंतु प्रवाशांना उभ्याने प्रवास करण्यास मनाई आहे.

22.कार्गो वाहतूक सर्व्हीसेस (जास्तीत जास्त तीन व्यक्तींसह),नियमितपणे पूर्ण वेळ : दररोज.

23.अंतर जिल्हा प्रवासी वाहतूक (खाजगी कार, टॅक्सी, बस) व ट्र्रेन नियमीतपणे, जर प्रवासी लेवल 5 मधील भागातून अथवा जिल्हामार्गे प्रवास करीत असल्यास अशा प्रवाशांना ई-पास आवश्यक राहिल.

24.उत्पादन क्षेत्र (Export Oriented Units) (निर्यात प्रधान उद्योग),नियमितपणे पूर्ण वेळ : दररोज

25.उत्पादन क्षेत्र (1. अत्यावश्यक वस्तू व त्याकरिता लागणारा कच्चा माल उत्पादक पॅकेजींग व संपूर्ण साखळीतील सेवा 2. निरंतर प्रक्रिया असलेले उद्योग 3. संरक्षण संबंधित उद्योग 4. डेटा सेंटर/ क्लॉवुड सर्व्हिस प्रोवायडर/ माहिती तंत्रज्ञान सेवा संबंधी, गुंतागुंतीचे पायाभूत सेवा व उद्योग) नियमितपणे पूर्ण वेळ : दररोज

26. उत्पादन क्षेत्र (अत्यावश्यक सेवा व निरंतर प्रक्रिया उद्योग, निर्यात प्रधान उद्योग व शासनाच्या आदेश दि. 04 जून 2021 मधील मुद्दा क्र. 23 व 24 मधील बाबी वगळून इतर उत्पादन क्षेत्रातील उद्योग व सेवा) 50% स्टाफचे हालचालीचे परवानगीसह ( With Transport Bubble )

27.शहर / ग्रामीण  कटकमंडळ (Cantonment zone)  क्षेत्रातील  आठवडी बाजार चालू करणे.

आठवडी बाजार / भाजी मंडई चालू करणेसाठी संबंधीत बाजारातील सर्व  व्यापारी,छोटे विक्रेते ,दुकान चालक यांना लसीकरण  Covid 19 चाचणी  करणे अनिवार्य राहिल. संबंधीत सर्व व्यक्तीचे या अटी व शर्तीसह आठवडी बाजार खुले राहण्यास मुभा राहिल

उपरोक्त सर्व बाबींसाठी Covid Appropriate Behavior (CAB) अनिवार्य आहे.
1)मास्क वापरणे  2) 2 गज दुरी (6 फुट अंतर) 3)सॅनीटायझर 4)आवश्यकतेनुसार फेसशिल्ड वापरणे आनिवार्य

शासन आदेश Download PDF

 

0 Response to "औरंगाबाद : अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय शनिवार आणि रविवार पूर्णपणे बंद, वाचा सविस्तर माहिती "

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe