-->
कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयातील मानव विकास शिक्षकांना समायोजन करण्यासाठी निवेदन

कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयातील मानव विकास शिक्षकांना समायोजन करण्यासाठी निवेदन

कस्तृरबा गांधी बालिका विद्यालयाच्या धर्तीवर मानव विकास मिशन कार्यकमाची सुरवात झाली असून त्याच धर्तीवर मानव विकास शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मानवविकास मिशन अंतर्गत इमारत व जडसंग्रहवस्तु आणि शिक्षक संख्या या बाबतचा माहिती MPSP कडे सादर केली आहे. परंतू मा. MPSP यांनी केवळ मानवविकास मिशन अंतर्गत इमारत व जडसंग्रहवस्तु व इ.९वी व १० वी विद्यार्थिनी यांचे हस्तांतरण केले परंतु या मध्ये शिक्षकांच्या समायोजनाचा कुठेही उल्लेख नाही.

तरी कस्त्रबा गांधी बालिका विद्यालय प्रकार ३ ( ६वी ते १०वी) समग्र शिक्षा अंतर्गत सूरु करण्यात येणार असून यास केद्रशासनाने शै. वर्ष २०२४-२०२५पासून सुरु करण्यास मान्यता दिली आहे. परंतु मानव विकासअंतर्गत विद्यार्थी  व इमारत याबाबत मा.महाराष्ट्र प्राथ्मिक शिक्षिण परीषद मुंबई यांनी समायोजन केलेले आहे.परंतु मानव विकास शिक्षकांच्या समायोजनाबाबत कुठेही उल्लेख नाही. जवळपास ११ते १२  वर्षापासून  अल्पशा मानधनावर काम करत आहोत. ज्याप्रमाणे इमारत व विदया्थी यांचे समायोजन केले त्याप्रमाणे सर्व शिक्षकांचेही समायोजन करावे. जर MPSP मानव विकास शिक्षकांचे उत्तरदायित्व घेण्यास तयार नसेल तर मानव विकास अंतर्गत हस्तांतर केलेले इमारत व जडवस्तुसंग्रह आणि इ.९ वी १०वी चे वर्ग यांचे हस्तांतरण रद करुन आहे असे वर्ग सूरु ठेवून शिक्षकांवर येणारी उपासमार व होणारा अन्याय थांबवावा कारण बरयाच शिक्षकांची वयोमर्यादा दुसरी नोकरीसाठी पात्र राहीलेली नाही. 

म्हणून शिक्षकांवर अन्याय होणार नाही व कोणताही स्त्री व पुरुष शिक्षक समायोजना पासून वंचित राहणार नाही याची हमी दयावी अशी मागणी महाराष्ट्र मानव विकास शिक्षक संघटना यांनी आयुक्त मानव आयुक्त औरंगाबाद छ. संभाजी नगर यांना केली.   तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास उपोषण करण्याचाही इशारा देण्यात आला.

1 Response to "कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयातील मानव विकास शिक्षकांना समायोजन करण्यासाठी निवेदन"

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe