-->
शाहरुख खानची केकेआर ठरली तिसऱ्यांदा आयपीएलची चॅम्पियन टीम

शाहरुख खानची केकेआर ठरली तिसऱ्यांदा आयपीएलची चॅम्पियन टीम आयपीएल 2024 चा फायनल सामना हा सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादवर 8 विकेट्सने विजय मिळवला असून यासह आयपीएल 2024 चं विजेतेपद मिळवलं आहे. यासह केकेआर तिसऱ्यांदा आयपीएलची चॅम्पियन टीम ठरली आहे.

चेन्नईतील एम चिदंबरम स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात फायनल सामना खेळवण्यात आला. या सामन्याच्या सुरुवातीला सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला तर केकेआरला प्रथम गोलंदाजीचे आव्हान दिले होते. यावेळी हैदराबादच्या टीमकडून फलंदाजी करताना इडन मार्करमने 20, नितेश रेड्डीने 13, हेन्रीचं क्लासेनने 16, पॅट कमिन्सने 24 धावा केल्या. तर इतर कोणत्याही खेळाडूला दोन अंकी धाव संख्या करणे शक्य झाले नाही. केकेआरच्या गोलंदाजांनी हैदराबादला ऑल आउट केले होते. कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांपैकी आंद्रे रसेलने 3, मिचेल स्टार्कने 2, हर्षित राणाने 2 तर वैभव अरोरा आणि वरूण चक्रवर्तीने प्रत्येकी १ विकेट घेतली. तर सनरायजर्स हैदराबादने 20 ओव्हरमध्ये केवळ 113 धावा केल्या ज्यामुळे केकेआरला विजयासाठी सोपे आव्हान मिळाले. हे आव्हान केकेआरने अवघ्या 11 ओव्हर्समध्ये पूर्ण केले. केकेआरकडून व्यंकटेश अय्यरने 52, गुरबाझने 39, तर सुनील नरेन आणि श्रेयस अय्यरने प्रत्येकी 6 धावा केल्या. हैदराबादला केवळ 2 विकेट्स घेणे शक्य झाले. त्यामुळे केकेआरने 8 विकेट्स राखून फायनल सामन्यात विजय नोंदवला आणि स्पर्धेचे विजतेपदं जिंकले आहे.


0 Response to "शाहरुख खानची केकेआर ठरली तिसऱ्यांदा आयपीएलची चॅम्पियन टीम "

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe