-->
जागतिक अजिंठा बौद्ध लेणीला जाणार्या हर्सुल टी पाॅंईट येथे तथागत गौतमबुद्ध यांचा भव्य पुतळा बसवा अन्यथा रस्त्यावरील आंदोलन छेडणार*...

जागतिक अजिंठा बौद्ध लेणीला जाणार्या हर्सुल टी पाॅंईट येथे तथागत गौतमबुद्ध यांचा भव्य पुतळा बसवा अन्यथा रस्त्यावरील आंदोलन छेडणार*...नितीन दाभाडे:- आज रोजी वरील विषयास अनुसरून आपणास अखिल भारतीय भिक्खू संघ, सर्व पक्षीय आंबेडकरवादी पक्ष संघटना व आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीने जाहीर निवेदन देत आहोत की, आपल्या ऐतिहासिक, जागतिक अजिंठा बौध्द लेणीला जाणाऱ्या हर्सल टी पॉईंट या मुख्य चौकात विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या महाकारुणिक तथागत गौतम बुध्द यांचा भव्य पुतळा बसविण्यात यावा. ही मागणी गेल्या अनेक वर्षापासुन अखिल भारतीय भिक्खु संघ व आंबेडकरवादी बहुजन विकास समिती, महाराष्ट्र राज्य व सर्वपक्षीय आंबेडकरवादी पक्ष संघटना करीत असुन महाराष्ट्रातील समस्त बौध्द, बहुजन, आंबेडकरवादी अनुयायांचा जिव्हाळ्याचा अस्मीतेचा हा विषय असून मागील अनेक वर्षापासुन अनेक आंबेडकरी संघटना ही मागणी घेवून लोकशाही मार्गाने असंख्य आंदोलने शासन दरबारी करीत आहेत. या आंदोलनाच्या अनुषंगाने समाजाची जिव्हाळ्याची भावना लक्षात घेवून तत्कालीन मनपा प्रशासक अभिजीत चौधरी यांनी अखिल भारतीय भिक्खु संघाला व आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या शिष्टमंडळाला सदरील हर्सल टी पॉईंट येथे तथागत गौतम बुध्दांचाच पुतळा बसेल असे तोंडी आश्वासने देऊन चौक सुशोभीकरणाचे काम सुरु केले होते. परंतु काही दिवसातच त्यांची या ठिकाणाहुन बदली करण्यात आली व सदरील मागणीला बगल देण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात आले. आली नाही. याऊलट मनपा प्रशासनकडून तथागतांच्या पुतळा बसविण्याचा विषय जाणीपुर्वक बाजूला सारून याच हसूल टी चौकाचे दोन वेळेस लाखो रुपये खर्च करुन सुशोभिकरण करण्यात येत आहे. परंतु तथागत बुध्दांचा पुतळा बसविण्याबाबत कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई अद्याप पर्यंत करण्यात आलेली नाही. परंतू काही महिन्यांपूर्वी मनपा प्रशासक जी. श्रीकांत हे सात दिवसांसाठी अतिरीक्त जिल्हाधिकारी पदी विराजमान होताच शहरातील दोन पुतळ्याला प्रशासकीय मंजुरी त्यांच्या मार्फत देण्यात आली आहे. तसेच वेदांत हॉटेल चौकातही भगवान महावीर शिल्पांना मंजुरी देवून कामही सुरु करण्यात आले आहे तसेच शहरातील मुख्य समजल्या जाणाऱ्या जालना रोडवरील कैब्रीज चौकात राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाला प्रशासनाने ५ कोटीचा निधी मंजुर करुन देत या मुख्य चौकात भव्य स्वागत कमान व राजमाता जिजाऊ यांचा पुतळा बसविण्याचे कामही सुरु करण्यात आले आहे. परंतु ज्या महामानवाने या संपूर्ण जगाला शांतीचा संदेश दिला अशा महाकारुणीक तथागत गौतम बुध्दांचा पुतळा बसविण्यालाच येथील काही प्रशासकीय अधिकारी जाणीवपुर्वक विरोध करीत आहेत, असा प्रश्न जागतिक पातळीवर निर्माण होत आहे.

ऐतिहासिक अजिंठा व वेरुळ लेणी पाहण्यासाठी जगभरातून दरवर्षी लाखो बौध्द अनुयायी पर्यटक हे शहरात येत असतात. यामधून केंद्रशासनाला व राज्यशासनाला पर्यटकांच्या माध्यमातून करोडो रुपये महसुल हा दरवर्षी मिळत असतो. परंतु येथील काही प्रशासनामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधांमुळेच तथागत भगवान बुध्दांच्या पुतळ्याला विरोध होत आहे. परंतु समस्त अखिल भारतीय भिक्खु संघ व आंबेडकरवादी बहुजन विकास समिती महाराष्ट्र राज्य तसेच सर्वपक्षीय आंबेडकरवादी पक्ष संघटना व समस्त बौध्द, बहुजन, आंबेडकरवादी अनुयायांच्या तीव्र भावना लक्षात घेवून लवकरात लवकर ऐतिहासिक अजिंठा बौध्द लेणीला जाणाऱ्या हसूल टि पॉईंट मुख्य चौकात महाकारुणिक तथागत गौतम बुध्द यांचा भव्य पुतळा लवकरात लवकर बसविण्यात यावा, ही नम्र विनंती. नसता या मागणीसाठी लोकशाही मार्गाने अखिल भारतीय भिक्खु संघ व आंबेडकरवादी बहुजन विकास समिती तसेच सर्वपक्षीय आंबेडकरवादी पक्ष संघटना व समस्त बौध्द, बहुजन, आंबेडकरवादी अनुयायांना सोबत घेवून रस्त्यावरील तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी. पर्यटकांच्या माध्यमातून करोडो रुपये महसुल हा दरवर्षी मिळत असतो. परंतु येथील काही प्रशासनामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधांमुळेच तथागत भगवान बुध्दांच्या पुतळ्याला विरोध होत आहे. परंतु समस्त अखिल भारतीय भिक्खु संघ व आंबेडकरवादी बहुजन विकास समिती महाराष्ट्र राज्य तसेच सर्वपक्षीय आंबेडकरवादी पक्ष संघटना व समस्त बौध्द, बहुजन, आंबेडकरवादी अनुयायांच्या तीव्र भावना लक्षात घेवून लवकरात लवकर ऐतिहासिक अजिंठा बौध्द लेणीला जाणाऱ्या हर्सल टि पॉइंट मुख्य चौकात महाकारुणिक तथागत गौतम बुध्द यांचा भव्य पुतळा लवकरात लवकर बसविण्यात यावा, ही नम्र विनंती. नसता या मागणीसाठी लोकशाही मार्गाने अखिल भारतीय भिक्खु संघ व आंबेडकरवादी बहुजन विकास समिती तसेच सर्वपक्षीय आंबेडकरवादी पक्ष संघटना व समस्त बौध्द, बहुजन, आंबेडकरवादी अनुयायांना सोबत घेवून रस्त्यावरील तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी. या मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना देण्यात आले यावेळी पूजनीय भदंत विशुद्धानंद बोधि महाथेरो, भंते संघप्रिय, दीपक निकाळजे,भंते बोधीधम्मो, भंते निर्वाण, भंते अमृतसागर, भंते संघदीप, अमित वाहुळ,सचिन जोगदंड,संतोष चव्हाण,आनंद कस्तुरे, प्रांतोष वाघमारे, रतनकुमार साळवे,चेतन गाडे, सुहास काळवे,अनामी मोरे,शुभम नवगीरे,भंन्ते अमृत सागर, भंते संघदीप, सोनू पाइकडे, व मोठ्या प्रमाणावर भिक्खु संघ,आंबेडकरवादी भीमसैनिकांची उपस्थिति होती..

0 Response to "जागतिक अजिंठा बौद्ध लेणीला जाणार्या हर्सुल टी पाॅंईट येथे तथागत गौतमबुद्ध यांचा भव्य पुतळा बसवा अन्यथा रस्त्यावरील आंदोलन छेडणार*..."

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe