-->
फुलंब्रीत हजरत टिपू सुलतान जयंती उत्साहात साजरी

फुलंब्रीत हजरत टिपू सुलतान जयंती उत्साहात साजरी

    फुलंब्री शहरात शनिवारी शेर ए हिंद तथा स्वतंत्र सेनानी हजरत टिपू सुलतान यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, या निमित्ताने रक्तदान शिबिर, रुग्णांना फळे वाटप, तसेच सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली होती.

    दरवर्षी शहरात 20 नवंबर रोजी जयंती साजरी होते परंतु या वर्षी उमुमी इज्तेमा मुळे सदरील जयंती 25 नवंबर ला साजरा करण्याचा निर्णय जयंती उत्सव समिती कडून घेण्यात आल्याने शनिवारी जयंती निमित्त ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. व नगर पंचायत कार्यालय च्या परीसरात भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले या वेळी बर्याच युवकांनी रक्तदान करुन आपला सहभाग नोंदविला सायंकाळी स्वतंत्र सेनानी हजरत टिपू सुलतान यांच्या प्रतिमेची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यात शेकडो तरुणांनी सहभाग घेतला होता. 

    याप्रसंगी स्वतंत्र सेनानी हजरत टिपु सुलतान रह. जयंती उत्सव कमिटी चे अध्यक्ष फरहान शहा, कार्याध्यक्ष अजय गंगावणे, उपाध्यक्ष जमाल शेख, विनोद कसारे, सचिव जावेद खान, सहसचिव शाहरुख पठाण, कोषाध्यक्ष इरफान सय्यद, सहकोषाध्यक्ष शेर खान, सरचिटणीस जाकेर पटेल, सहसरचिटणीस आवेज शहा, प्रसिद्धी प्रमुख पदी जाकेर आतार, सरफराज पटेल यांच्या सह माजी जिप अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, पत्रकार इमरान खान, पत्रकार इस्माइल खान, शिवसेना उप तालुका प्रमुख अय्युब पटेल, कृऊबा संचालक अजहर सय्यद, समिर पठाण, जफर चिस्ती, मुदस्सर पटेल, अड. आसिफ पटेल, जमिर पठाण, फेरोज पठाण, राजु शहा, मोबीन पाशा, अनसार पटेल,मोबीन पटेल, रईस पटेल, गुड्डू शेख, आसेफ शेख,इमरान सय्यद, सलमान शेख, हारुण शेख, बबलु शेख इम्रान पटेल सह अन्य नागरीकांची उपस्थिती होती.

0 Response to "फुलंब्रीत हजरत टिपू सुलतान जयंती उत्साहात साजरी"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe