-->
बिडकीन शहर चकरी नावाच्या ऑनलाइन जुगारात फसलाय का ?

बिडकीन शहर चकरी नावाच्या ऑनलाइन जुगारात फसलाय का ?


बिडकीन : पैठण तालुक्यातील बिडकिन गाव नाही तर शहरच म्हणावं लागेल परंतु बिडकीन अवैध धंद्याच्या विळख्यात पडलं आहे का ? हा प्रश्न उपस्थित होणाचे मुख्य कारण म्हणजे सूत्रांकडून माहिती मिळाल्याप्रमाणे जगभरात डिएम आय सी संदर्भात नावाजलेले बिडकिन येथे चकरी नावाच्या ओनलाइन जुगाराने जनसामान्यांच्या संसारात मिठ घातले आहे.

गोरगरीब व कष्टकरी आणि नवतरुण यांचे भविष्य धोक्यात येऊ लागले आहे. बिडकिन येथील बसस्थानक परिसर व निलजगाव रोडवर हि मोठ्या प्रमाणात हा चकरी नावाचा जुगार दिवसाढवळ्या खेळत असल्याचे धक्कादायक बातमी समोर आली आहे. 

नवतरूणाच्या आईवडिल यांच्या वतीने या चकरी जुगार वर कार्यवाही व्हावी अशी विनंती करण्यात येत आहे. आता खरंच जर असं प्रकरण घडत असेल तर कार्यवाही नक्की व्हायला पाहिजे. जेणे करून तरुणाई या पासून बरबाद होणार नाही. ही बाब प्रशासनाने अत्यंत गांभीर्याने घेतली पाहिजे.

0 Response to "बिडकीन शहर चकरी नावाच्या ऑनलाइन जुगारात फसलाय का ?"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe