
ट्रक आणि ट्रॅव्हल्सला भीषण अपघात; दोन्ही वाहनांचा चक्काचूर, १० प्रवासी गंभीर जखमी
शनिवार, ६ मे, २०२३
Comment
परभणी: ट्रॅव्हल्स आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १० प्रवाशांसह ट्रकचा चालक गंभीर जखमी झाल्याची घटना पोखारणी-पाथरी रोडवरील हमदापूर फाटा येथे सकाळी घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की ट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच मानवत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पोखरणी-पथरी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आहे.
0 Response to "ट्रक आणि ट्रॅव्हल्सला भीषण अपघात; दोन्ही वाहनांचा चक्काचूर, १० प्रवासी गंभीर जखमी"
टिप्पणी पोस्ट करा