-->
जडेजाने अखेरच्या दोन षटकांत १० धावा करत संघाला विजय मिळवून दिला

जडेजाने अखेरच्या दोन षटकांत १० धावा करत संघाला विजय मिळवून दिला


 चेन्नईचा नाद का करायचा नाही... याचे उत्तर सर्वांनाच आयपीएलच्या फायनलच्या दिवशी मिळाले. कारण चेन्नईच्या संघाने यावेळी डकवर्थ लुईस नियमांनुसार -- विकेट्स राखून विजय मिळवला आणि पाचव्यांदा आयपीएलच्या चषकाला गवसणी घातली. गुजरातने चेन्नईपुढे विजयासाठी २१५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने दमदार फलंदाजी करत केला आणि जेतेपद पटकावले.गुजरातच्या २१५ धावांचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात पावसाचे आगमन झाले. त्यावेळी चेन्नईची बिन बाद ४ अशी अवस्था होती. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमांनुसार १५ षटकांमध्ये १७१ धावांचे आ्हान देण्यात आले. मैदानात परतल्यावर ऋतुराज गायकवाडने चौकारासह गुजरातचे स्वागत केले. त्यानंतर ऋतुराज आणि डेव्हॉन कॉनवे यांनी दमदार फलंदाजी केली आणि संघाला विजयाची आशा दाखवली. पण पॉवर प्लेनंतर हे दोघेही बाद झाले. त्यानंतर अजिंक्य राहणे दमदार फलंदाजी करून बाद झाला. महेंद्रसिंग धोनी तर पहिल्याच चेंडूवर बाद झाला. पण जडेजाने अखेरच्या दोन षटकांत १० धावा करत संघाला विजय मिळवून दिला.गुजरातला दुसऱ्याच षटकात मोठे जीवदान मिळाले. कारण तुषार देशपांडेच्या या दुसऱ्या षटकातच शुभमन गिलला जीवदान मिळाले, त्यावेळी तो तीन धावांवर होता. गेल्या सामन्यातही त्याला जीवदान मिळाले होते आणि त्याने शतक झळकावले होते. त्यामुळे गिल पुन्हा एकदा जीवदानाचा फायदा घेत शतक झळकावणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. पण त्याचवेळी धोनीने चाणाक्षपणे गिलला बाद केल्याचे पाहायला मिळाले. कारण पॉवर प्ले नंतरच्या पहिल्याच षटकात धोनीने रवींद्र जडेजाला गोलंदाजीसाठी पाचारण केले. जडेजाच्या गोलंदाजीवर धोनीने जलदगतीने यष्टीचीत केले आणि गिलला बाद केले. गिलला यावेळी ३९ धावा करता आल्या. गिल बाद झाल्यावर वृद्धिमान साहा आणि साई सुदर्शन यांच्यात दमदार भागीदारी झाल्याचे पाहायला मिळाले. साहाने यावेळी आपले अर्धशतक साजरे केले. पण त्यानंतर तो जास्त काळ खेळपट्टीवर तग धरून राहू शकला नाही. साहाने यावेळी ३९ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५४ धावा केल्या. साहा बाद झाला तरी साई सुदर्शन मात्र चेन्नईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत होता. त्याने तुफानी फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले. त्यानंतर त्याच्या फटक्यांचा जोर वाढला आणि तो शतकाच्या जवळ आला. साई सुदर्शन आता शतक करणार असे वाटत होते. पण यावेळी फक्त चार धावा त्याला शतकासाठी कमी पडल्या. साई सुदर्शनने यावेळी ४७ चेंडूंत आठ चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर ९६ धावांची दमदार खेळी साकारली.

0 Response to "जडेजाने अखेरच्या दोन षटकांत १० धावा करत संघाला विजय मिळवून दिला"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe