-->
मुंबईविरूद्धचे शेर केकेआरसमोर झाले ढेर! शार्दुल सुयश शाईन, चक्रवर्तीच्या फिरकीने RCB चक्रावले

मुंबईविरूद्धचे शेर केकेआरसमोर झाले ढेर! शार्दुल सुयश शाईन, चक्रवर्तीच्या फिरकीने RCB चक्रावले


 रॉयल चॅलेंजर बेंगलोरने आपल्या घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सचा 8 विकेट्स राखून मोठा पराभव करत आयपीएलची दमदार सुरूवात केली. मात्र कोलकाता नाईट रायडर्सने दुसऱ्याच सामन्यात त्यांना जमिनीवर आणले. केकेआरने शार्दुल ठाकूरच्या झंजावाती 63 धावांच्या जोरावर आरसीबीसमोर विजयासाठी 205 धावांचे मोठे लक्ष ठेवले. मात्र तगडी बॅटिंग लाईन असलेली आरसीबी चेस करताना 123 थावातच अडकली. केकेआरने आपल्या घरच्या मैदानावर आरसीबीचा 81 धावांनी मोठा पराभव केला.मुंबई इंडियन्सविरूद्ध 171 धावांचे आव्हान 16.2 षटकात पार करणाऱ्या आरसीबीची केकेआर विरुद्ध अवस्था 5 बाद 61 धावा अशी झाली. सलामीवीर विराट कोहली 21 कर्णधार फाफ ड्युप्लेसिस 23 धावा करून बाद झाले. त्यानंतर वरूण चक्रवर्तीच्या फिरकीपुढे आरसीबीच्या फलंदाजांना चक्कर यायला लागली.चक्रवर्तीने ड्युप्लेसिस सह मॅक्सवेल आणि हर्षल पटेलची शिकार केली. सुनिल नरेनने शाहबाज अहमदची विकेट घेत आरसीबीची अवस्था 6 बाद 83 अशी केली. यानंतर इम्पॅक्ट प्लेअर सुयष शर्माने आरसीबीची मधील फळी कापून काढली. त्याने दिनेश कार्तिकला 9 अनुज रावत आणि कर्ण शर्माला 1 धावेवर बाद केले.तत्पूर्वी, होम ग्राऊंडवर नाणेफेक गमावल्यामुळे पहिल्यांदा फलंदाजी करावी लागलेल्या केकेआरची सुरूवात खराब झाली. आरसीबी कर्णधार फाफ ड्युप्लेसिसने डेव्हिड विलीला हंगामातील पहिला सामना खेळण्याची संधी दिली. त्याने या संधीचे सोने करत केकेआरची अवस्था 2 बाद 26 अशी केली.या परिस्थितीतून केकेआरचा सलामीवीर रेहमनुल्ला गुरबाजने अर्धशतकी खेळी करत बाहेर काढले. मात्र दुसऱ्या बाजून पडझड होत होती. अखेर कर्ण शर्माने रेहमनुल्लाची अर्धशतकी खेळी 57 धावांवर संपवली पाठोपाठ आंद्रे रसेलला शुन्यावर बाद करत केकेआरला मोठा धक्का दिला.केकेआरची अवस्था 5 बाद 89 अशी झाली असताना मुंबईकर शार्दुल ठाकूर कोलकात्याला सावरण्यासाठी धावला. त्याने 20 चेंडूत अर्धशतकी खेळी करत केकेआरला 150 पार पोहचवले.शार्दुल ठाकूरने रिंकू सिंहं सोबत सहाव्या विकेटसाठी तब्बल 103 धावांची शतकी भागीदारी रचली. 19 व्या षटकात रिंकू 46 धावा करून बाद झाला. त्यानंतर शार्दुलने 29 चेंडूत 63 धावांची खेळी करत संघाला द्विशतकाच्या उंबरठ्यावर पोहचवले. अखेर उमेश यादवने चौकार मारत केकेआरला 20 षटकात 7 बाद 204 धावांपर्यंत पोहचवले.

0 Response to "मुंबईविरूद्धचे शेर केकेआरसमोर झाले ढेर! शार्दुल सुयश शाईन, चक्रवर्तीच्या फिरकीने RCB चक्रावले"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe