-->
नाशिकमध्ये एसटी बसच्या भीषण अपघातात महिला वाहकासह प्रवासी महिलेचा मृत्यू

नाशिकमध्ये एसटी बसच्या भीषण अपघातात महिला वाहकासह प्रवासी महिलेचा मृत्यू


 समोरुन येणाऱ्या वाहनाला चुकवल्यानंतर एसटीचा रॉड तुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि एसटी बस थेट समोरील झाडावर आदळली. हा अपघात देवळा मनमाड मार्गावर चांदवड शहराजवळील मतेवाडीजवळ झाला. या अपघातात महिला वाहकासह एका प्रवासी महिलेचा मृत्यू झाला. तर १३ प्रवाशांसह चालक जखमी झाला आहे.

मनमाड आगाराची बस नांदुरीकडे गेली होती. तिकडून परत नांदुरीच्या दिशेने येत असताना समोरून येणाऱ्या वाहनाने कट मारल्यामुळे त्याला चुकवताना एसटीचा रॉड तुटला. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून एसटी बस मतेवाडी शिवारातील गांगुर्डे वस्तीजवळ झाडावर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की बसची एक बाजू पूर्णपणे चक्काचूर झाली.अपघातात सारिका लहिरे या महिला कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला तर संगीता बाळकृष्ण खैरनार (४५ रा. मनमाड) या महिला प्रवाशाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून जखमींना तातडीने चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही जखमींची प्रकृती गंभीर आहे

0 Response to "नाशिकमध्ये एसटी बसच्या भीषण अपघातात महिला वाहकासह प्रवासी महिलेचा मृत्यू"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe