-->
 खामगाव येथे फार्मसी महाविद्यालयात औद्योगिक प्रशिक्षण कौशल्य व व्याप्ती यावर व्याख्यान सपन्न...

खामगाव येथे फार्मसी महाविद्यालयात औद्योगिक प्रशिक्षण कौशल्य व व्याप्ती यावर व्याख्यान सपन्न...

(लोकसवाल न्यूज प्रतिनिधी शाहरुख शेख. फुलंब्री)

फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथील श्री गोरक्ष औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात(फार्मसी कॉलेज) "औद्योगिक प्रशिक्षण कौशल्य व व्याप्ती या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्याख्याते श्री. मैञेय ,श्री योगेश दळवी व श्रीमती कोमल थोरात यांनी या विषयावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. 

तसेच  विद्यार्थ्यांना विविध आधुनिक विश्लेषण तंत्र  त्यासाठी लागणारे  कौशल्य, साहित्य,‎फार्मास्युटिकल विश्लेषणात्मक तंत्र उपकरणे आणि साधन आदी बाबत‎ सखोल माहिती श्री.मैत्रेय यांनी विद्यार्थ्यांना दिली. तसेच उद्योग‎ उभारण्यासाठी लागणारी‎ साधनसामुग्री, आर्थिक नियोजन‎‎‎‎‎‎‎‎‎‎ याबद्दल श्री दळवी यांनी सविस्तर माहिती दिली.

तसेच श्रीमती कोमल थोरात यांनी अनेक‎ औषध निर्माण कंपन्यातील वेगवेगळ्या‎ उत्पादनांसाठी चालणाऱ्या‎ कार्यप्रणाली  विद्यार्थ्यांना‎ वेगवेगळ्या उपकरणांची तसेच‎ कार्याची माहिती दिली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री.मोहन सोनवणे, श्री.अभिलाष सोनवणे,प्राचार्य‎. डॉ.संतोष शेप प्राचार्य.श्री.भगवान काळे प्रा.वैष्णवी चिवटे, प्रा.ऋतुजा ढाकणे, प्रा. स्नेहल ढेवळे,प्रा.श्री.शरद जोशी,प्रा.दीपक भोजने,प्रा.अश्विनी पवार, प्रा. कानडजे, प्रा.सोनाली कलम,प्रा.बागेश्वरी जिवरग प्रा.अतुल काळे,प्रा.मेघा बनकर, प्रा.चिकने, प्रा. शेख, प्रा. गायकवाड , प्रा. देशमुख प्रा. खैरनार तसेच शिक्षक व शिक्षकतेर कर्मचारी यांची‎ उपस्थिती होती.‎

0 Response to " खामगाव येथे फार्मसी महाविद्यालयात औद्योगिक प्रशिक्षण कौशल्य व व्याप्ती यावर व्याख्यान सपन्न... "

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe