
भुसावळ तालुक्यामध्ये पावसाने लावली हजेरी ; शेतकरी चिंतेत
सोमवार, ६ मार्च, २०२३
Comment
JALGOAN - भुसावळ तालुक्यामध्ये विजांचा कडकडाट पाहायला मिळाला , त्याचबरोबर धुवाधार पावसाने हजेरी लावली आहे. तसेच या पावसामुळे शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. गहू, हरभरा, कांदा पीक काढणीच्या तोंडालाच असताना अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हाता तोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हिरावला जाणार की काय ? यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
0 Response to "भुसावळ तालुक्यामध्ये पावसाने लावली हजेरी ; शेतकरी चिंतेत "
टिप्पणी पोस्ट करा