
येवल्यात दुभाजकाला धडकून तवेरा गाडी पलटी; एक जण ठार तीन जण गंभीर जखमी
बुधवार, ८ मार्च, २०२३
Comment
नगर- मनमाड महामार्गावर येवल्यातील नांदेसर चौफुली जवळ दुभाजकाला धडकून तवेरा गाडी पलटी झाली. या अपघातात १ जण ठार ३ जण गंभीर जखमी झाले. कोपरगाव येथून मालेगावला जात असलेल्या तवेरा गाडीच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी दुभाजकावर जाऊन आदळली. या गाडीने २ ते ३ पलटी मारल्या यात एकाचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे गाडीत एकूण आठ जण होते ते सर्व मालेगाव येथील रहिवाशी आहे. या अपघाताची माहिती मिळताच येवला शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर जखमींना येवल्यातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येऊन पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलविण्यात आले आहे.
0 Response to "येवल्यात दुभाजकाला धडकून तवेरा गाडी पलटी; एक जण ठार तीन जण गंभीर जखमी"
टिप्पणी पोस्ट करा