
ट्रकची मागून जोरदार धडक, ऊसतोड कामगारांचा भीषण अपघात; २५ जण जखमी
गुरुवार, १६ मार्च, २०२३
Comment
बीडमधील माजलगाव तेलगाव रोडवर लहामेवाडी येथे सकाळच्या सुमारास दोन ट्रकांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातांमध्ये २० ते २५ ऊसतोड कामगार गंभीर जखमी झाले आहेत.: बीडच्या माजलगाव तेलगाव रोडवर लहामेवाडी फाट्याजवळ सकाळच्या सुमारास पाठीमागून आलेल्या ट्रकने कर्नाटककडून जालना जिल्ह्यातील मंठा येथे जाणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तब्बल २० ते २५ ऊसतोड कामगार जखमी झाल्याची घटना घडली असून जखमींवर माजलगाव बीड परभणी औरंगाबाद येथे उपचार चालू असल्याचे सांगण्यात येत आहे.प्राथमिक माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील ऊसतोड कामगार आपल्या गावी जात असताना माजलगाव तेलगाव रोडवरील लहामेवाडी फाटा येथे सकाळी साडे सहाच्या दरम्यान त्यांच्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. या भीषण अपघातामध्ये २० ते २५ ऊसतोड कामगार जखमी झाले आहेत.
0 Response to "ट्रकची मागून जोरदार धडक, ऊसतोड कामगारांचा भीषण अपघात; २५ जण जखमी"
टिप्पणी पोस्ट करा