
समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच; दोन ट्रकच्या अपघातात एकाच मृत्यू
बुधवार, १५ मार्च, २०२३
Comment
लोकसवाल न्यूज : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच असून, औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील हर्सूल ते माळीवाडा दरम्यान समृद्धीवर एका ट्रकने दुसऱ्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. यात ट्रकमधील एका जणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर प्राथमिक माहितीनुसार ट्रक समृद्धी महामार्गावरुन कांदा घेऊन जात होता, त्यावेळी हा अपघात झाला आहे. विशेष म्हणजे हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्हीही ट्रकला क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढण्यात आले आहे.
0 Response to "समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच; दोन ट्रकच्या अपघातात एकाच मृत्यू"
टिप्पणी पोस्ट करा