-->
नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला जाताना कार दरीत कोसळली; पतीचा जागीच मृत्यू, पत्नी जखमी

नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला जाताना कार दरीत कोसळली; पतीचा जागीच मृत्यू, पत्नी जखमी

 ( बीड) - नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जाताना अज्ञात वाहनाने हुल दिल्याने चालकाचा ताबा सुटुन कार दरीत कोसळुन झालेल्या अपघातात शिक्षक पतीचा जागीच मृत्यू झाला.  तर पत्नी जखमी झाल्याची घटना बीडसांगवी येथील महादेव दरा येथील घाटात आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. अंबादास पांडुरंग उगले असे मयत शिक्षकांचे नाव आहे.श्रीगोंदा तालुक्यातील थेटे सांगवी येथील उगले हे गेवराई येथील एका शाळेवर शिक्षक म्हणून नोकरी करतात. तर त्यांची पत्नी आणि मुले लातूर येथे असतात. कडा येथील एका नातेवाईकांच्या अंत्यविधी असल्याने उगले हे कारने ( क्रमांक एम.एच २३,ए.डी.०२४९) आज सकाळी गेवराईवरून कड्याला  आले होते. तर पत्नी लातूरवरून सावरगाव घाटपर्यंत सह काऱ्यांच्या गाडीत आली होती.शिक्षक उगले हे कड्यावरून पत्नीला सोबत घेत कारमधून निघाले. दरम्यान, बीडसांगवी येथील महादेव दरा घाटात अज्ञात वाहनाने हुल दिल्याने ताबा सुटुन कार खोल दरीत कोसळली. यात अंबादास पांडुरंग उगले यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी सगुना या जखमी झाल्या. 

0 Response to "नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला जाताना कार दरीत कोसळली; पतीचा जागीच मृत्यू, पत्नी जखमी"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe